पातुरमध्ये आणखी तीन कोरोना बाधित, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू, बाधितांच्या आकडा गेला 74 वर

श्रीकृष्ण शेगोकार
Tuesday, 14 July 2020

शहरातील वाढती कोरोणा बाधितांची संख्या चिंताजनक असताना दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर आज प्राप्त अहवालानुसार पुन्हा तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले.

पातूर (जि.अकोला) ः शहरातील वाढती कोरोणा बाधितांची संख्या चिंताजनक असताना दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर आज प्राप्त अहवालानुसार पुन्हा तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले.

शहरातील वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता आरोग्य विभागाने रॅपिड एंटीजन टेस्ट करावी असा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने गेल्या आठवड्यात 5 व 6 रोजी नगरपरिषद शाळा क्रमांक एक व दोन तसेच लक्ष्मीबाई देशपांडे विद्यालय पातूर येथे रॅपिड एंटीजन टेस्ट किटचा वापर सर्वप्रथम पातूरमध्ये करण्यात आला होता. यावेळी 21 जण पॉझिटिव्ह आले होते.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यांच्या घरातील हाय रिस्क कॉन्टॅक्‍टमधील साठ जणांना आरोग्य प्रशासनाणे डॉ. वंदनाताई ढोणे कोविड केअर सेंटर तसेच मौलाना आजाद कोविड केअर सेंटर येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांच्यापैकी 48 जणांचे स्वाब शनिवारी तपासणीला पाठवले असतात त्यांचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. त्यामध्ये तीन जण पॉझिटिव्ह आले असून, त्यात दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे.

सीबीएसई बारावी परीक्षेत अकोल्यातील विद्यार्थी चमकले 

बारा जणांचे स्वाब उद्या घेणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्‍टर विजयसिंह जाधव यांनी सांगितले. दरम्यान, पातूर येथील एका 52 वर्षीय रुग्णाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Video: अरे हे काय? पेट्रोल दिलं नाही म्हणून चक्क ऑफिसमध्येच सोडले कोब्रा नाग 

मृताच्या अंत्यविधी नंतर नगरपरिषद पातूरच्या मुख्याधिकारी सोनाली यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड-19 समन्वयक अधिकारी सैजाद विरानी व त्यांच्या टीमने स्मशानभूमीत निर्जंतुकीकरनाचे काम पूर्ण केले आहे. आता पातुर शहरातील एकूण बाधितांचा आकडा 74 झाला असून त्यातील 27 जणांनी कोरोणा वर मात केली तर ते 40 जण उपचार घेत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three more corona infections in akola Patur, one death during treatment, the number of victims went up to 74