Akola News : तीन हजारांवर शेतकऱ्यांची ई-केवायसी रखडली; पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी संपृक्तता मोहीम

पीएम किसान योजनेचा लाभ मिळावा यासाठी पात्र ठरल्यानंतर सुद्धा ई-केवायसी न झाल्याने हजारो शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नव्हता.
three thousand ekyc pending pm kisan samman nidhi scheme agriculture akola
three thousand ekyc pending pm kisan samman nidhi scheme agriculture akolaSakal

Akola News : पीएम किसान योजनेचा लाभ मिळावा यासाठी पात्र ठरल्यानंतर सुद्धा ई-केवायसी न झाल्याने हजारो शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नव्हता. अशा १ लाख ९१ हजार ९०८ शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यात मोहीम राबविण्यात आली. परंतु त्यापैकी अद्याप तीन हजार २०४ शेतकऱ्यांची ई-केवायसी करणे बाकी आहे.

संबंधितांकडून २१ फेब्रुवारीपर्यंत ई-केवायसी प्रमाणिकरण व इतर बाबींची पूर्तता करून घेण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यात कृषी विभागाकडून गावपातळीवर संपृक्तता मोहीम राबविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी दिली.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) ही देशातील सिमांत तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी लाभ देणारी सर्वात महत्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो.

शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरणाच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असल्याने शेतकऱ्यांना त्वरीत या पैशांचा वापरही करता येतो. सरकारने या योजनेचा लाभ देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न चालवला आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना स्वतःहून या योजनेत सहभाग घेण्यासाठी थेट नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी ‘पीएम किसान’ संकेतस्थळावर जावून लाभार्थ्यांना थेट अर्ज करता येतो.

या सुविधेमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही दलाल अथवा मध्यस्थाशिवाय एक रुपयाही खर्च न करता पंतप्रधान किसान सन्मान योजनेत आपले नाव नोंदवता येत आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवण्याच्या कटकटीपासून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. दरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १६व्या हप्त्याची रक्कम फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी मिळणार आहे.

याच लाभार्थ्यांना ‘महासन्मान’चा लाभ

केंद्र शासन पी.एम. किसान योजनेचा १६वा हप्ता माहे फेब्रुवारी २०२४च्या शेवटच्या आठवड्यात वितरित करणार आहे. तसेच पी.एम. किसान योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थीनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा होईल.

दोन्ही योजनांच्या लाभासाठी २१ फेब्रुवारीपर्यंत आवश्यक बाबींची पूर्तता या मोहिमेदरम्यान करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. अधिक महितीसाठी नजिकचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असेही त्यांनी सांगितले.

लाभासाठी शेतकऱ्यांनी हे करावे

केवळ ई- केवायसी प्रमाणिकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नजिकच्या सामाईक सुविधा केंद्र व ग्रामस्तरीय नोडल अधिकारी यांच्या यांचे मार्फत प्रमाणिकरण पूर्ण करून घ्यावे. शेतकऱ्यांनी स्वत:चे ई-केवायसी प्रमाणिकरण करण्यासाठी मोबाइलवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र, पी.एम.किसान फेस ऑथेंटीकेशन ॲप या सुविधांपैकी कोणत्याही एका सुविधेचा वापर करावा.

पी.एम.किसान योजने अंतर्गत ई-केवायसी प्रमाणिकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर असणे आवश्यक आहे. बँक खात्याला आधार संलग्न करावयाचा राहिलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या सोयीनुसार प्राधान्याने नजिकचे पोस्ट कार्यालयात आधार संलग्न खाते उघडावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com