

Nagpur’s 24 tigers and 30 leopards still await transfer approval; CZA delay stalls relocation plan.
nagpur
-राजेश रामपूरकर
नागपूर : गेल्या काही दिवसांत राज्यात वन्यजीव आणि मानव संघर्ष वाढला आहे. वाघ आणि बिबट्याच्या मानवावरील हल्ल्याच्या घटना दररोज उघडकीस येत आहे. जेरबंद केलेल्या अथवा जखमी झालेल्या वाघ अथवा बिबट्यांना बंदिस्त करून गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात आणले जाते. त्यामुळे गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात सध्या क्षमतेपेक्षा जास्त वाघ आणि बिबटे आहेत. त्यातील आठ वाघ आणि सहा बिबट्यांच्या स्थलांतराचा प्रस्ताव केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे (सीझेडए) वन विभागाकडून पाठविण्यात आला. मात्र, अद्यापही त्याला हिरवा कंदील न दिल्याने दोन्ही वन्यप्राण्यांचे स्थलांतरण प्रशासकीय विलंबात अडकल्याची माहिती पुढे आली.