आला रे आला वाघ आला! वनविभागाची गस्त

अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात ‘वाघ आला’ अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.
Tiger
TigerSakal

अकोला : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात ‘वाघ आला’ (Tiger) अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. चर्चेचे मुळ शोधल्यानंतर मात्र, ‘तो’ वाघ नसून बिबट असल्याचे आढळून आले. आता, अकोला तालुक्यातील ढगा, जवळा, वाळकी परिसरात सुद्धा वाघ दिसून आल्याची जोरदार चर्चा आहे. वनविभागाने (Forest Department) मात्र अजून या विषयाला ठोस दुजोरा दिला नसून, चर्चेच्या अनुषंगाने परिसरात सर्च ऑपरेशन मात्र जोरात सुरू आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी शहरी तसेच शेतशिवार भागात वाघ दिसल्याचे, वाघाच्या पाऊल खुना दिसून आल्याचे विषय गाजत आहेत. काही दिवसांपूर्वी अकोला तालुक्यात कौलखेड-खडकी भागात त्यानंतर बाळापूर तालुक्यात, पातूर तालुक्यातही वाघ आल्याची अफवा परसरली होती. वाघ धावत असल्याचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Tiger
शिवपुतळा विटंबना निषेधार्थ संकेश्वरला निषेध फेरी

मात्र, वनविभाग व जिल्हा प्रशासनाने संबंधित व्हिडिओ जुने व दुसऱ्या भागातील असल्याचे कळविले होते. आता मात्र, अकोला तालुक्यातच कुरणखेड, काटेपूर्णा, ढगा, वाळकी, जवळा परिसरात वाघ दिसून आल्याच्या चर्चेला उधान आले असून, तसा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे. मात्र, अजूनपर्यंत वनविभागाने या विषयला ठोस दुजोरा दिला नसून, परिसरात सर्च ऑपरेशन मात्र सुरू आहे.

या भागातील नागरिकांकडून वाघ दिसल्याची चर्चा आहे व वाघ दिसून येत असलेला एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. त्या व्हिडिओची सत्यता तपासली जात आहे. वनविभागाने याबाबत तपास केला असता चिखल भागात पाऊल खुना दिसून आल्या आहेत परंतु, त्या वाघाच्या आहेत की बिबटाच्या हे सांगणे कठीण आहे. या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू असून, नागरिकांनी, शेतकऱ्यांनी सतर्क राहावे.

- राजसिंह ओवे, वनपरिक्षेत्र अधिकारी, अकोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com