आईवडिलांना ओझे नको म्हणून तिने संपविले जीवन

तिवसा तालुक्यात १७ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
आत्महत्या
आत्महत्या sakal

तिवसा : ‘आईवडिलांना ओझे नको म्हणून मी हे जीवन संपवित आहे’, असे लिहून तिने आपले जीवन संपविले. तालुक्यातील कुऱ्हा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या छिदवाडी येथील १७ वर्षीय मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सेजल गोपाल जाधव, असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. अवघ्या १७ वर्षीय मुलीच्या आत्महत्येने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत सेजलने स्वतःच्या भावना व्यक्त केल्या. वडिलांना शेतमजुरी व तीन एकर शेती करून उदरनिर्वाह करावा लागतो. त्यात सतत होत असलेली नापिकी व घरातील आर्थिक परिस्थितीमुळे आयुष्य जगणे दिवसेंदिवस कठिण होत आहे. त्यातही दोन बहिणी, एक लहान भाऊ, अशा सर्वांच्या पोटाचा व भविष्याचा बिकट प्रश्न आहे. सध्याची महागाई व मुलांचे शिक्षण, हे सर्व करीत असताना आईवडिलांना अतोनात त्रास होत आहे. त्यामुळे माझे ओझे कमी व्हावे, याकरिता मी आपले जीवन संपवित आहे, असे लिहून सेजलने आपल्या घरातील पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. कुऱ्हा पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

"घटनास्थळाचा पंचनामा करीत असताना मृतदेहाच्या जवळ एक चिट्ठी मिळाली. या चिट्ठीवरून गरिबीला कंटाळून संबंधित मुलीने आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे. तरी या घटनेची चौकशी सुरू आहे. घटनास्थळावरून तिचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून, तिच्या मैत्रिणींकडून माहिती घेण्यात येत आहे. संपूर्ण चौकशीअंती कारण स्पष्ट होईल."

-ईश्वर वर्गे, ठाणेदार, कुऱ्हा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com