
अकोला : उद्या मतदान; आज रवाना होणार मतदान पथके
अकोला : जिल्हा परिषदेच्या हातरुण सर्कलसह ग्रामपंचायतीच्या इतर सहा जागांसाठी सुरु असलेली प्रचाराची रणधुमाळी शुक्रवारी (ता. २) संपली. संबंधित जागांसाठी रविवारी (ता. ५) मतदान होणार असून मतदान पथके शनिवारी (ता. ४) मतदान केंद्रांसाठी रवाना होतील. त्यानंतर ६ जून मतमोजणी करण्यात येईल.
जिल्हा परिषदेच्या बाळापूर तालुक्यातील हातरूण सर्कलमधून निवडून आलेल्या शिवसेनेच्या सदस्या सुनीता सुरेश गाेरे यांना विभागीय आयुक्तांनी पुन्हा अपात्र घोषित केल्यामुळे या सर्कलसाठी पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीत कॉंग्रेस, शिवसेना, भाजप व वंचितच्या उमेदवारांमध्येच थेट लढत होणार आहे, तर एकमात्र एक अपक्ष सदस्य सुद्धा निवडणुकीच्या मैदानात आहे. या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी होतो त्यावर सत्ता समीकरण अवलंबून असल्याने ही निवडणूक सत्ताधारी वंचित व विरोधातील इतर पक्षांसाठी अतिशय महत्वाची आहे. दरम्यान या सर्कलसाठी प्रचार शुक्रवारी (ता. ३) संपला असून रविवारी (ता. ५) मतदान होणार आहे. त्यामुळे मतदानासाठी शनिवारी (ता. ३) मतदान पथके मतदान केंद्रांवर रवाना होणार आहेत.
जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हातरूण जिल्हा परिषद सर्कलसह सहा ग्रामपंचायतीमधील सहा रिक्त पदांची पोटनिवडणूक होत आहेत. तेथे निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी मतदानाच्या एक दिवस आधी, मतदानाच्या दिवशी व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.
Web Title: Tomorrow 5 June 2022 Voting For Akola Zilla Parishad Gram Panchayat Election For Six Gram Panchayat Seats Akola
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..