esakal | शेतशिवारात बारा मोर आढळले मृतावस्थेत
sakal

बोलून बातमी शोधा

शेतशिवारात बारा मोर आढळले मृतावस्थेत

शेतशिवारात बारा मोर आढळले मृतावस्थेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आगर: अनेक वर्षापासून मोलखड नाल्याजवळ मोरांचे वास्तव्य आहे. ता.५ जुलै रोजी संध्याकाळी ५.३० वाजताच्या सुमारास या नाल्याजवळ गुरे शोधणाऱ्या गुराख्याला अचानक बारा मोर मृतावस्थेत दिसून आले. घटनेची माहिती गावकऱ्यांना कळताच असंख्य पशू प्रेमी व गावकरी यांनी नाल्याच्या काठावर धाव घेतली असता काही मोर रस्त्यावर तर काही मोर झाडावर लटकलेल्या अवस्थेत दिसले. (Twelve peacocks were found dead on the farm)

हेही वाचा: जिल्हा परिषदेच्या राजकारणात विधानसभेची मोर्चेबांधणी


गावकरी नाल्याजवळ जाण्या अगोदरच गावातील कुत्रे, वन्यजीव प्राणी, डुकरे, कोल्हा या प्राण्यांनी या पक्ष्यांचे लचके तोडले व काही मोर इतर वन्यजीव प्राण्यांनी फस्त केले. घटना स्थळावरून माहिती जाणून घेतली असता, मोर पक्षांनी नुकतीच काही शेतकऱ्यांनी पेरणी केल्यामुळे पेरणी बियाण्याला विषारी लिक्विड लावले होते. पक्षांनी ही बियाणे खाल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Twelve peacocks were found dead on the farm

loading image