दोन चोरट्यांनी केली नऊ ठिकाणी घरफोडी | Akola | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला : दोन चोरट्यांनी केली नऊ ठिकाणी घरफोडी

अकोला : दोन चोरट्यांनी केली नऊ ठिकाणी घरफोडी

अकोला : बंद घरांना लक्ष्य करून तब्बल नऊ ठिकाणी घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांच्या मुसक्या अकोला स्थानिक पोलिसांनी आवळल्या आहेत. या चोरट्यांकडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने व इतर असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही चोरटे बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुख्यात असलेल्या पेनसांवगी येथील रहिवासी आहेत.

अकोला जिल्ह्यात घरफोडी चोरीचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमद्ये भितीचे आतावरण असून, आपली संपती घरातच सुरक्षित नसल्याची भावना व पोलिसांबद्दलचा रोष नागरिकांमध्ये वाढत आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला घरफोडीच्या प्रकरणाचा छडा लावण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सागर हटवार यांचे पथकाने तपास करीत राजेंद्र सोनू भोसले (२७)आणि सरोज लखन चव्हाण (२७) या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली.

हेही वाचा: जळगाव : कोरोनाकाळातही प्रभागात सर्वाधिक कामे

एक दोन नव्हे तर चक्का नऊ ठिकाणी चोरी केल्याचे तपासातून उघड झाले. त्यात गेले काही दिवसांपासून खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या पाच घरफोडीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. बोरगाव मंजू, पिंजर, अकोट ग्रामीण आणि जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दतीहीया जोडीने घरफोडी केल्याची कबुली दिली. दोन्ही चोरट्यांकडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुद्देमालपैकी ५० हजार रुपये रोख आणि जवळपास ५६ ग्रॅम सोने, ज्याचे मूल्य एक लाख ७५ हजार ५६१ रुपये आहे आणि १८ हजार ८१२ रुपयांची ४१० ग्रॅम चांदी, असा एकूण दोन लाख ४४ हजार ३७३ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, सहायक पोलिस अधीक्षक रितू खोखर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांचे आदेशानुसार पोउपनि. सागर हटवार, पसदाशिव सुळकर, प्रमोद डोईफोडे, नितीन ठाकरे, अब्दुल माजीद, संदीप तवाडे, मोहम्मद रफी, सुशिल खंडारे, रोशन पटले, सतिश गुप्ता यांचे पथकाने केली.

loading image
go to top