कोरोनाकाळातही प्रभागात सर्वाधिक कामे | Jalgaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार अनिल पाटील : अमळनेरला विविध विकासकामांचे भूमिपूजन

जळगाव : कोरोनाकाळातही प्रभागात सर्वाधिक कामे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : पालिका निवडणुकीत सर्वाधिक मते या ७ व ८ प्रभागात मिळाली आहेत. त्याचाच परिणाम म्हणून कोरोना काळातही आज या प्रभागात १ कोटी १० लाख रुपये किंमतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले आहे, ही बाब गौरवास्पद असल्याचे मत आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केले. शहरातील ढेकूरोडवर प्रभाग क्रमांक सातमधील १ कोटी १० लाख रुपये किंमतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, नागरी हित समितीचे प्रा. अशोक पवार, निवृत्त व्यवस्थापक नाना पाटील, ए. टी. पाटील, डांगरीचे माजी सरपंच अनिल शिसोदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. आमदार अनिल पाटील यांची जिल्हा बँकेवर बिनविरोध झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला.

हेही वाचा: औरंगाबाद : मद्यपी बसचालकाचा डुलत-डुलत पुणे-औरंगाबाद प्रवास

यावेळी साहेबराव पाटील म्हणाले, पालिका ताब्यात आल्यावर ६० महिन्यात १८ महिने कोरोनात तर २२ महिने नगरसेवक अपात्र प्रकरणात गेले. यामुळे पाहिजे तशी कामे करता आले नाही. मात्र तरी आमदार अनिल पाटील यांच्या सहकार्याने १० कोटी ५० लाखांची कामे मिळाली. या प्रभागात ६ कोटी रुपयांची सर्वाधिक सुमारे ३२ कामे दिली आहेत. यावेळी दीपक बिऱ्हाडे यांचा सत्कार करण्यात आला.

तर राजमुद्रा फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यायाम शाळा मागणीचे निवेदन देण्यात आले. जेष्ठ नागरिक प्रकाश पाटील यांनी माजी आमदार साहेबराव पाटील यांच्याकडे ‘ओपन प्लेस’मधील स्वच्छता करण्याबाबत गाऱ्हाणे मांडले. यावेळी श्री. काटकर, विशाल देशमुख, दिनेश सूर्यवंशी, मनोज पाटील, प्रभाकर शिंदे, प्रभाकर पाटील, युवराज पाटील, किशोर महाले, किशोर पाटील, शेखर धनगर, उदय चौधरी, गणेश पाटील आदी उपस्थित होते. आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्याम पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन दयाराम पाटील यांनी तर आभार उमेश काटे यांनी मानले केले.

या कामांचा समावेश

आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते वृंदावन व रेऊनगरातील ५० लाख ७५ हजार रुपयांचे रस्ते काँक्रीटीकरण तर दीपकनगरातील रस्ते काँक्रीटीकरणासाठी २० लाख १५ हजार रुपये, महात्मा फुले कॉलनीतील काँक्रीटीकरणासाठी १० लाख ४ हजार रुपये, भगवतीनगरातील रस्ते काँक्रीटीकरणासाठी २९ लाख ६६ हजार रुपये इतक्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

loading image
go to top