

Martyr Prashant Raut Memorial Left in Limbo for 20 Years Amid Civic Indifference
sakal
-सिद्धार्थ वाहुरवाघ
अकोला : अंतिम संस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने शेजारील गावात असलेल्या स्मशानभूमीत मृतकावर अंतिम संस्कार करण्याची नामुस्की शिवणीवासीयांवर होती. अत्यंत जिद्द आणि चिकाटीवर सैन्य दलात दाखल झालेले शिवणी येथील तरुण प्रशांत राऊत यांना वीरमरण आले. त्यांचाही अंतिविधी पूर्ण करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने स्थानिकांच्या प्रयत्नामुळे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठची जागा शिवणीला कायमस्वरूपी स्मशानभूमीसाठी देण्यात आली. मात्र, ज्यांच्या वीरमरणामुळे ‘सरणा’साठी जागा मिळाली, त्यांच्याच स्मारकासाठी दोन दशकांपासून लोकप्रतिनिधींसह प्रशासनही अपयशी ठरले.