esakal | गाडी सांभाळा; चोरी करून नंबर प्लेट बदलत अकरा गाड्या झाल्या गायब
sakal

बोलून बातमी शोधा

गाडी सांभाळा; चोरी करून नंबर प्लेट बदलत अकरा गाड्या झाल्या गायब

गाडी सांभाळा; चोरी करून नंबर प्लेट बदलत अकरा गाड्या झाल्या गायब

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तुमच्याकडे मोटरसायकल असेल तर सांभाळा, कारण लोणार येथे तब्बल अकरा मोटरसायकल चोरून त्यांची परस्पर नंबरप्लेट बदलून नवीन आरसीबुक काढत चोरीचा नवा प्रकार समोर आला आहे.


लोणार (जि.बुलडाणा) : तुमच्याकडे मोटरसायकल असेल तर सांभाळा, कारण लोणार येथे तब्बल अकरा मोटरसायकल चोरून त्यांची परस्पर नंबरप्लेट बदलून नवीन आरसीबुक काढत चोरीचा नवा प्रकार समोर आला आहे. शहरासह परिसरातील दुचाकी चोरून बनावट कागदपत्रे बनवून विक्री करणार्‍या युवकाला लोणार पोलिसांनी अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Two-wheeler thieves arrested in Lonar town of Buldana district)


लोणार शहरासह परिसरातून दुचाकीच्या घटना घडल्या आहे. पोलिसांनी चोराचा शोध घेण्याचा गुप्त खबर्‍यामाफत माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश मिळाले नाही. लोणार चौक येथे वाहनांची तपासणी करीत असताना एक मुलगा दुचाकी चालवत असताना आढळला. त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासत त्याला पोहेकॉ सुरेश काळे यांनी ताब्यात घेतले.

हेही वाचा: लॉकडाउनचा फायदा किती?, महिनाभरात १४ हजार रुग्ण, ५४४ जणांचा मृत्यू

त्याची सखोल चौकशी केली असता त्याने आपले नाव हरीस खान नसीर खान रा. काटे नगर, लोणार असे सांगितले. त्याने आपली परिस्थिती हलाखीची असल्याने दुचाकीची चोरी करीत असल्याचे सांगितले. त्याने हिरो होंडा आणि बजाज कंपनीच्या 11 दुचाकी चोरल्या. त्या सर्व पोलिसांनी जप्त केल्या आहे.

हेही वाचा: कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दररोज ३०० च्यावर

तो दुचाकी चोरून त्याचे नंबर प्लेट बदलत एका दुचाकीचे आरसी बुकची कलर झेरॉक्स काढून त्यावर हाताने खोडतोड करत मोठया शिताफीने दुचाकी विकत होता. त्याचा हा व्यवसाय मागील सहा महिन्यापासून सुरू होता. लोणार पोलिसांनी चोरीच्या दुचाकी घेणार्‍या 5 व्यक्तींनाही ताब्यात घेतले. सदरची कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलिस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी मेहकर विलास यामावर यांनी केलेल्या मार्गदर्शनात ठाणेदार रवींद्र देशमुख, पीएसआय भारत बरडे, पोहेकॉ सुरेश काळे, पोकॉ कृष्णा निकम व चंद्रशेखर मुरडकर यांनी। केली. वाहनधारकांनी ओळख पटविण्यासाठी लोणार पोलिस स्टेशनला संपर्क साधावा तसेच वाहन घेताना सावधानता बाळगावी असे आव्हान केले आहे.

संपादन - विवेक मेतकर

Two-wheeler thieves arrested in Lonar town of Buldana district