Medical Scam : अकोला शहरात परवाना वेगळ्याचा आणि दवाखाना चालवणारा डॉक्टर वेगळा, अशी धक्कादायक प्रकरणे समोर आली आहेत. मनपाच्या आरोग्य पथकांकडून गुप्त सर्चिंग सुरू आहे.
अकोला : आरोग्य व्यवस्थेला काळिमा फासणाऱ्या बोगस डॉक्टर प्रकरणात धक्कादायक तपशील समोर आले आहेत. हरिहर पेठ भागात कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना रुग्णालय चालवणाऱ्या डॉक्टरवर अलीकडेच महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई केली होती.