Akola News : दोन तालुक्यांचे अहवाल रखडले, सर्वेक्षणास विलंब; प्राथमिक अहवालानुसार ६४ हजार हेक्टर क्षेत्र बाधित

अवकाळीचा ८३२ गावांना फटका बसला असून, ६३ हजार ८६१ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान
unseasonal rain crop damage survey report 64 thousand hectare area affected akola marathi news
unseasonal rain crop damage survey report 64 thousand hectare area affected akola marathi newsesakal

Akola News: जिल्ह्यात २६ नोव्हेंबरच्या रात्रीपासून ते २९ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत अवकाळी पाऊस झाला. पावसाचे पाणी अनेक शेतांमध्ये साचले. अवकाळीचा ८३२ गावांना फटका बसला असून, ६३ हजार ८६१ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.

परंतु पातूर व अकोट तालुक्यांच्या संयुक्त सर्वेक्षण (नुकसान भरपाई) अहवाल शुक्रवारी (ता. १५) सायंकाळपर्यंत प्रशासनाला प्राप्त झाला नाही, इतर पाच तालुक्यांचे मात्र प्राप्त झाले आहेत. सर्वेक्षणाला होत असलेल्या विलंबाने शासनाकडून मदत जाहीर होण्यासही उशिर होत आहे.

जिल्ह्यात २६ नोव्हेंबरच्या रात्रीपासून सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली. अवकाळी पावसामुळे कापूस पिकांचं मोठं नुकसान झालं. २६ नोव्हेंबरच्या रात्रीपासून २७ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत जिल्ह्यात ३२.६ मिमी तर २७ नोव्हेंबरच्या रात्रीपासून २८ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत २१.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

अवकाळी पूर्वी शेतशिवार कापसाने पांढरे झाले होते, परंतु मजुरांअभावी कापसाचा वेचा थांबला होता. त्यातच अवकाळी पावसामुळे कापूस भिजल्याने पांढरे सोने मातीमोल झाले. तुरीच्या पिकाला आलेला बहराचा सोसाट्याचा वाऱ्यामुळे शेतात सडा पडला.

दरम्यान नुकसानग्रस्त क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले असून अकोला, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, बाळापूर व तेल्हारा तालुक्याचे नुकसानीचे अहवाल प्राप्त झाले आहेत परंतु अकोट व पातूर तालुक्यांचे अहवाल रखडले आहेत.

unseasonal rain crop damage survey report 64 thousand hectare area affected akola marathi news
Akola News : शेतकऱ्यांना १०५.४० कोटींची नुकसान भरपाई

अवकाळीमुळे असे झाले नुकसान

प्राथमिक अहवालानुसार अवकाळी पावसामुळे अकोला तालुक्यातील ३५ गावातील सात हजार १५१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. बार्शीटाकळीतील तीन हजार ५४१ हेक्टरला अवकाळीचा व १६० गावांना फटका बसला.

मूर्तिजापूर तालुक्यातील १६६ गावातील ७ हजार ९१०, अकोट येथील १८६ गावांतील १५ हजार ६५२ हेक्टर, तेल्हारा येथील ७८ गावांतील तीन हजार ३७८ हेक्टर, बाळापूर तालुक्यातील ११३ गावांतील २३ हजार २०८ हेक्टर व पातूर तालुक्यातील ९४ गावांतील दोन हजार २१३ हेक्टरचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com