Akola News : गारपीटसह अवकाळी पावसाने झोडपले

तालुक्यात काही भागात सोमवारी रात्री अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात गारपीट झाल्याने शेतातील हरभरा, ज्वारी, गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
Akola News
Akola Newssakal

तेल्हारा : तालुक्यात काही भागात सोमवारी रात्री अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात गारपीट झाल्याने शेतातील हरभरा, ज्वारी, गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यासोबतच वादळी वाऱ्याने आंब्याचे व संत्र्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील वेगवेगळ्या भागात सोमवारी रात्री झालेल्या पावसाने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोमवारी सायंकाळी तेल्हारा शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. जोरदार अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे शेतातील हरभरा, ज्वारी, गहू तुर,आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याचेही नुकसान झाले असून गारपीटमुळे टरबूज पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

अवकाळी पावसाचा फटका तेल्हारा शहरासह खापरखेड थार, भांबेरी, दहिगाव गाडेगाव माळेगाव, बेलखेड मनब्दा अटकळी, दापुरा ,पंचगव्हाण,मनात्री यासह तालुक्यात अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बसला आहे. रब्बी पिकांची काढणी सुरू असतानाच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फेब्रुवारी महिना अंतिम टप्प्यात आला असतानाही अवकाळी पाऊस सुरुच असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सायंकाळी सुरू झालेला पाऊस कमी अधिक प्रमाणात बरसत होता.

अनेक ठिकाणी गारपीट झाली. शिवाय खंडित झालेला विद्यूत पुरवठा मध्यरात्री पर्यंत सुरू झाला नव्हता .अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्याच्या सुचना देण्यात याव्यात अशी मागणी शेतकरी करीत आहेत.वादळी वाऱ्यामुळे तेल्हारा ते आडसुळ मार्गावर खापरखेड फाटा ते दहिगाव फाट्यादरम्याण बाभुळचे मोठे झाड रस्त्यावर पडल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com