
लसीकरणाचे नियोजन बिघडले; गर्दीत कोरोना नियम पायदळी
अकोला ः कोरोना विषाणू संसर्गावर (Corona virus infection) नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरलेल्या सरकारी यंत्रणांचे लसीकरणाचे (Vaccination) नियोजनही बिघडले आहे. लसीकरण केंद्रावरील ढिसाळ कारभाराने नागरिकांच्या होणाऱ्या गर्दी सर्व कोरोना नियम पायदळी तुडविले जात आहे. त्यात लसीचे तुटपुंजे डोज भर घालत आहे. लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) हेलपाटे खावे लागत असून, एका-एका डोजसाठी तीन-तीन दिवस फेऱ्या टाकूनही लस मिळत नसल्याने साठी ओलांडलेले जीव मेटाकुटीस आल्याचे चित्र अकोला शहरातील लसीकरण केंद्रांवर मंगळवारी बघावयास मिळाले. Vaccination planning went awry; Corona rules pedestrians in the crowd
काेव्हॅक्सिनाचा दुसरा डाेस १५० असतानाच ४५० पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लसीसाठी सकाळी १०.३० वाजतापर्यंत जिल्हा स्त्री रुग्णालयात गर्दी केली होती. यंत्रणांकडे नियोजनांच्या अभावाचा फटका येथे आलेल्या नागरिकांना बसला.
हेही वाचा: एक कोटी देतो रेमडीसिव्हर द्या, मी फुकट वाटतो
वेळेवर स्त्री रुग्णालयातील केंद्र आकाेट फैल परिसरातील मनपाच्या आरोग्यवर्धनी केंद्रावर असल्याचे अधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यामुळे लाभार्थ्यांनी धावपळ करीत अकोट फैलचे केंद्र गाठले. दीड तासा प्रतीक्षा केल्यानंतर या केंद्रावर १५० जणांनाच लस दिली जाईल, अशी व्यवस्था असल्याचे कळल्यावर अनेकांचा हिरमोड झाला.
हेही वाचा: पॉझिटिव्ह रुग्ण २४ तासात झाला निगेटिव्ह!
अधिकारी अनभिज्ञ, नागरिकांचा गोंधळ
अकाेट फैल केंद्र असल्याचे जाहीर केल्यानंतर स्त्री रुग्णालयातून तेथे पोहोचलेनंतर तेथील अधिकाऱ्यांना येथे लसीकरण केंद्र आहे, याचीच माहिती नसल्याने नागरिकांना धक्का बसला. धावपळ करून येथेपर्यंत पोहोचल्यानंतर अधिकारी म्हणतात येथे लस मिळत नाही, हे ऐकल्यानंतर नागरिकांनी आक्रमक हाेऊन कूपनची मागणी केली. काही वेळाने या केंद्रावर जयस्वाल नामक अधिकारी आले. त्यांनी केंद्रातील दाराजवळ असलेल्या ५० नागरिकांना कुपन दिले. कुपनच्या प्रतीक्षेत रांगेत उन्हात उभे असलेले नागरिक मात्र वंचितच राहिले. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आणि लसीकरण केंद्रावर एकच गाेंधळ उडाला.
हेही वाचा: न्युमोनियाच्या नावाखाली कोरोना रुग्णांवर उपचार
खडकी केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांना हेलपाटे
खडकी येथील लसीकरण केंद्राला भेट दिली असता येथे एक ज्येष्ठ नागरिकांचे जोडपे बसले होते. त्यांच्याकडे विचारणा केली असता तीन दिवसांपासून लस घेण्यासाठी केंद्रावर फेऱ्या मारत आहेत. घरी कुणीही नसल्याने दोघांनाच पायी यावे लागले होते. विवाहित मुलगी बाहेर गावी, मुलगा पुण्याला. शेजारी लसीसाठी आग्रह धरत असल्याने भर उन्हात हे जोडपे तीन दिवसांपासून चकरा मारत आहे. त्यांच्यासारखे अनेक ज्येष्ठ नागरिक दुसऱ्या डोजसाठी लसीकरण केंद्रावर फेऱ्या घालून त्रस्त झाले आहेत.
संपादन - विवेक मेतकर
Vaccination planning went awry; Corona rules pedestrians in the crowd
Web Title: Vaccination Planning Went Awry Corona Rules Pedestrians In The
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..