esakal | तीन लसीकरण केंद्रावर लसीकरण राहणार बंद
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण

तीन लसीकरण केंद्रावर लसीकरण राहणार बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः शहरातील तीन लसीकरण केंद्रावरील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सोमवारी (ता. १२) एक दिवस बंद राहणार आहे, तर आठ लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. (Vaccination will be closed at three vaccination centers)

हेही वाचा: मध्यरात्री स्‍मशानभूमित अघोरी पुजा; मांत्रिकांसह युवकावर कारवाईकोरोनाला हरविण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणाशिवाय दुसरा कोणताच उपाय सध्या उपलब्ध नसल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहेत. त्यामुळे सर्वत्र कोरोना लसीकरणाला प्राथमिकता देण्यात येत आहे. कोरोना लसीकरणाअंतर्गत आता १८ वर्षावरील सर्व लाभार्थ्यांना लस देण्यात येत असल्यामुळे लसीकरणाची गती वाढली आहे. दरम्यान सोमवारी (ता. १२) शहरातील नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर मनपा शाळा क्रमांक २२, नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प (खडकी), नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर (आयुर्वेदिक दवाखाना) या केंद्रावरील लसीकरण बंद राहणार आहे.

हेही वाचा: अबब...२० लाखांचा बोकड,आठवडी बाजारात बघ्यांनी केली गर्दी

तर नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ, आरकेटी आयुर्वेदिक कॉलेज, नागरी आरोग्य केंद्र खदान, डीएचडब्ल्यू लेडी हार्डिंग येथे १८ वर्षावरील नागरिकांना कोव्हिशील्डची लस देण्यात येईल. त्यासोबतच नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट जवळ, कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड, भरतीया हॉस्पिटल, नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी येथे कोव्हॅक्सीनची लस देण्यात येईल.

संपादन - विवेक मेतकर

Vaccination will be closed at three vaccination centers

loading image