
केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत या प्रमुख मागणीसाठी आणि शेतकरी हिताच्या इतर मागण्यांसाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी पाठिंबा जाहीर केला आहे.
अकोला : केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत या प्रमुख मागणीसाठी आणि शेतकरी हिताच्या इतर मागण्यांसाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी पाठिंबा जाहीर केला आहे.
देशभरातील शेतकऱ्यांनी या मागणीसाठी 8 डिसेंबर 2020 रोजी 'भारत बंद' ची हाक दिली आहे. वंचित बहुजन आघाडी या 'बंद'मध्ये सहभागी होत असून सर्वांनी हा बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन सुध्दा करीत आहे.
उद्योगपतींच्या हिताचे आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणारे कायदे सरकारने रद्द करावेत. शेतमालाला किमान हमीभावाचे संरक्षण कायद्याद्वारे मिळावे. बाजारभाव पडल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतक-याचा माल सरकारने विकत घ्यावा आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून तात्काळ 50% रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची तरतूद कायद्यात करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे करीत आहे.
या बंदमध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीकेले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणबाजी
वंचित बहूजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकार विरोधात घोषणा दिल्या.
प्रतिष्ठाणे बंद करण्याचा प्रयत्न
जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणा दिल्यानंतर वंचिच्या कार्यकर्त्यांच्या मोर्चा व्यापारी प्रतिष्ठाणांकडे वळला. शहरातील प्रतिष्ठाणे बंद करण्याचे व्यापाऱ्यांना आवाहन करीत केंद्र सरकारविरोधात घोषणाही दिल्या.
(संपादन - विवेक मेतकर)