Akola News : वाहन चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक; दोन दुचाकी व एक मालवाहू वाहन जप्त

स्थानिक गुन्हे शाखने दोन वेगवेगळ्या कारवाईत एक मालवाहू वाहन व दोन दुचाकी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना जेरबंद केले
vehicle theft case three arrested 2 bike 1 tempo seize akola crime police
vehicle theft case three arrested 2 bike 1 tempo seize akola crime policeSakal

Akola News : स्थानिक गुन्हे शाखने दोन वेगवेगळ्या कारवाईत एक मालवाहू वाहन व दोन दुचाकी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना जेरबंद केले. सदर आरोपींकडून पोलिसांनी चोरी गेलेले वाहन जप्त केले आहेत.

जिल्ह्यात मोठ्‍या प्रमाणात चारचाकी व दुचाकी वाहन चोरीचे प्रकार घडत असल्याने पोलिस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना गुन्हे उघडकीस आणून आरोपी जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे १ जानेवारी २०२४ रोजी मालवाहू वाहन चोरी करणारे संशयित शेख इरशाद शेख आझाद (वय २८ वर्ष, रा. हमजा प्लॉट, जुने शहर)

व मोहम्मद समीर अन्सारी मोहम्मद शरीफ अन्सारी (वय २४ वर्ष, रा. मेहबूब शाह तकीया लालीज रकुल, मोमीन पुरा, नागपूर) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी रामदास पेठ पोलिस स्टेशन येथून कलम ३७९ भादंवि मधील चोरी गेलेली एक टाटा कंपनीचे चारचाकी मालवाहू वाहन क्रमांक एमएच-०२-ईआर-१८४७ किंमत अंदाजे तीन लाख रुपये चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली.

सदर वाहन जप्त करून आरोपींना रामदास पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. व आरोपींची विचारपूस केली असता आरोपींनी चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. सदर आरोपीकडून दोन्ही दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com