अकोला : टीईटी प्रमाणपत्रांची हाेणार पडताळणी

शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्रमाणपत्र करावे लागणार सादर
TET certificate
TET certificate sakal

अकोला : ग्रामीण भागातील शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे टीईटी प्रमाणपत्र पडताळणीसाठी जमा केल्यानंतर आता महापालिक, नगर परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांचे प्रमाणपत्र संकलित हाेणार आहेत. संबंधितांना त्याचे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे जमा करावी लागणार आहेत.

याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र जारी केले आहे. त्यामुळे आता शहरी भागातील शिक्षकांच्या चिंतेत भर पडली आहे.शिक्षण विभागातील राज्यस्तरावरील टीईटी भ्रष्टाचार प्रकरण उजेडात आल्यानंतर राज्य शासनाने १३ फेब्रुवारी २०१३ नंतर अनुदानित, अंशत: अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये पाचवी ते आठवीपर्यंत रुजू शिक्षकांचे मूळ टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्रांच्या पडताळणीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी सर्व अधिकाऱ्यांना आदेश देत प्रमाणपत्र सादर करण्याचा आदेश दिला.

त्यानुसार शिक्षण विभागाने (प्राथमिक) प्रमाणपत्र जमा करण्याची प्रक्रिया राबविली. परंतु आता महापािलका, न.प.च्या शाळांमधील संबंधित शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्र संकलनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे ग्रामीणनंतर आता शहरी भागातील शिक्षकांच्या चिंतेत भर पडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com