अकोला : प्रतीक्षा संपली; आरटीईची सोडत सोमवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wait is over RTE applications selected list declared Monday akola

अकोला : प्रतीक्षा संपली; आरटीईची सोडत सोमवारी

अकोला : आरटीईअंतर्गत खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या पालकांच्या पाल्यांच्या अर्जांची सोडत सोमवारी (ता. ४) शासन स्तरावरून काढण्यात येणार आहे. त्यासोबतच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची निवड यादी सुद्धा याच दिवशी आरटीईच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना याच दिवशी मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतील. त्यामुळे गत वीस दिवसांपासून आरटीई सोडतीची प्रतीक्षा करणाऱ्या पालकांची प्रतीक्षा संपल्याचे दिसून येत आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) २०१९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्याअंतर्गत समाजातील आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले पालक जास्त प्रवेश शुल्क असलेल्या शाळांमधून आपल्या मुलांना शिकवू शकत नव्हते; मात्र आरटीईमुळे अशा पालकांचे त्यांच्या मुलांना खासगी शाळांमधून शिकवण्याचे स्वप्न साकार होत आहे. दरम्यान यंदा आरटीई कोट्यातून प्रवेश मिळावा, यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पालकांना अर्ज करण्याची शेवटची संधी २८ फेब्रुवारी होती. परंतु नंतर १० मार्चपर्यंत वाढवण्यात आली. दरम्यान आता अंतिम मुदत संपली असून अर्ज करणाऱ्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या पालकांची संख्या ६ हजार २ झाली आहे. संबंधितांपैकी लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड ४ एप्रिल रोजी करण्यात येईल.

संकेतस्थळावर खात्री करण्याचे आवाहन

आरटीई २०२२-२३ या वर्षाकरिता लॉटरीद्वारा निवड झालेल्या आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची यादी सोमवार ४ एप्रिल २०२२ रोजी दुपारी ४ नंतर आरटीई पोर्टल वर प्रसिद्ध केली जाईल. तसेच प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतील, परंतु फक्त एसएमएसवर अवलंबून न राहता पालकांनी आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

अशी आहे स्थिती

  • नोंदणीकृत शाळा - १९६

  • आरक्षित जागा - १९९५

  • प्राप्त अर्ज - ६००२

  • जास्त प्राप्त अर्ज - ४००७

Web Title: Wait Is Over Rte Applications Selected List Declared Monday Akola

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top