अकोला : युद्धभूमीतील विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्याची प्रतीक्षाच!

दोन विद्यार्थी कीव, एक दुतावासात आणि एक लिव्हिवमध्ये सुरक्षित
अकोला : युद्धभूमीतील विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्याची प्रतीक्षाच!

अकोला : रशिया व युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. या युद्धामुळे देशातील हजारो नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांचा समावेश असल्याने युक्रेनमध्ये अडकेल्या विद्यार्थ्यांचे पालक चिंताग्रस्त आहेत. दुसरीकडे चारही विद्यार्थी युक्रेनमध्ये सुरक्षित असल्याची माहिती आहे. त्यापैकी दोन विद्यार्थी कीव, एक भारतीय दुतावास तर एक लिव्हिवमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती आहे.

रशियाने युक्रेनच्या काही भागांमध्ये हवाई हल्ले केल्यामुळे रशिया आणि युक्रेनमधील वाद चिघळला आहे. अशा परिस्थितीत देशातील सरकार युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या आपल्या राज्यातील मुलांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील तब्बल बाराशे विद्यार्थी अडकले होते. त्यापैकी काही विद्यार्थी बरत आले आहेत, तर काही परतीच्या प्रतीक्षेत आहेत. युक्रेनमधील परिस्थिती रोज भयंकर होत असतानाच या मुलांचे भारतातील पालक चिंतेत आहेत.

दर तासाला घरच्या लोकांकडून त्यांची विचारणा केली जात आहे. युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी भारतीय दुतावास कार्यालयाच्या सातत्याने संपर्कात असून, दुतावासाने त्यांच्या परतण्यासाठी विमानाची व्यवस्था केली जाईल असे सांगितले आहे. दरम्यान रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार रोमानियाहून एअर इंडियाचे पहिले विमान युक्रेनमध्ये अडकलेल्या २१९ विद्यार्थ्यांना घेऊन मुंबईत दाखल झाले. तसेच आणखी ३०० विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे दुसरे विमान रोमानियाहून भारतात पोहचले. परंतु परत आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थी नसले तरी ते वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षित असल्याची माहिती आहे.

अशी आहे विद्यार्थ्यांची स्थिती

मोहित माळेकर हा विद्यार्थी स्थानिक दत्त कॉलनीमधील रहिवासी असून युक्रेन येथे एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. युद्धाच्या या स्थितीत तो लिव्हिलमध्ये आहे. हुसैनउल्ला खान व प्राप्ती भगवान भालेराव ही विद्यार्थीनी युक्रेनच्या कीवमध्ये तर स्थानिक व्हीएचबी कॉलनीतील रहिवाशी व सध्या युक्रेनमध्ये अडकेलेला जॅकशारोन एडवर्ड निक्सन विद्यार्थी भारतीय दुतावासात सुरक्षित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com