
नव्या वर्षाच्या सुरुवातीला संपूर्ण राज्यावरचे संकट जावे, नवीन वर्ष सुखाचे जोवो, संपूर्ण देश कोरोना मुक्त असावा, असे साकडे बालाजीला घातले.
वाशीम : वाशिममधील बालाजी मंदिरात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज ( ता. १) पूजा अर्चना करत आरती करून दर्शन घेतलं.
त्यांनी नव्या वर्षाच्या सुरुवातीला संपूर्ण राज्यावरचे संकट जावे, नवीन वर्ष सुखाचे जोवो, संपूर्ण देश कोरोना मुक्त असावा, असे साकडे बालाजीला घातले.
नंतर मंत्री राजेश टोपे सकाळी ८ वाजता जगद्गुरू संत सेवालाल महाराज, जगदंबादेवी, राष्ट्रीय संत डॉ. रामरावबापू महाराज समाधीचे दर्शनासाठी व बापूचे उत्तराधिकारी बाबूसिंग महाराज यांची भेट व आशीर्वाद घेण्यासाठी श्री. क्षेत्र पोहरादेवी कडे रवाना झाले.
हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री ना. राजेश टोपे ३१ डिसेंबरला दुपारी मुबंई वरून विमानाने नांदेड येथे आले, तेथून शासकीय वाहनाने वाशिम येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचे शासकीय निवस्थान येथे भेट व शासकीय विश्रामगृह येथे मुकाम केला.
हेही वाचा - थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनची धम्माल चर्चेत, रविकांत तुपकरांनी खालली शेतकऱ्यासोबत चटणी-भाकर
त्यानंतर नववर्षाच्या सकाळी ६:०० वाजता वाशिम येथे श्री बालाजी देवस्थानाला भेट देऊन पूजा अर्चना केली. त्यानंतर श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे जगद्गुरू संत सेवालाल महाराज, जगदंबादेवी, राष्ट्रीय संत डॉ. रामरावबापू महाराज समाधीचे दर्शनासाठी व बापूचे उत्तराधिकारी संत बाबूसिंग महाराज यांची भेट व आशीर्वाद घेण्यासाठी रवाना झाले.
(संपादन - विवेक मेतकर)