esakal | तीन दिवसांत सहा टक्क्यांनी वाढला पाणीसाठा!
sakal

बोलून बातमी शोधा

तीन दिवसांत सहा टक्क्यांनी वाढला पाणीसाठा!

तीन दिवसांत सहा टक्क्यांनी वाढला पाणीसाठा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः गत दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठ्‍या काटेपूर्णा प्रकल्पासह मोर्णा प्रकल्पातील पाणीसाठी सहा टक्क्यांनी वाढला. काटेपूर्णा प्रकल्पात शनिवारी (ता. १०) २७.१३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता, परंतु पावसामुळे मंगळवारी (ता. १३) पाणीसाठा ३२.६० टक्क्यांवर पोहचला. मोर्णा प्रकल्पात सुद्धा शनिवारी (ता. १०) ३२.८४ टक्के पाणी होते, तर आता त्यात ३८.४५ टक्के पाणी जमा झाले आहे. त्यामुळे या अल्प पावसामुळे शेतकरी सुखावला असून जलसाठ्‍याची वाढ सुद्धा दिलासादाक आहे. (Water reserves increased by six per cent in three days!)

हेही वाचा: सुनेला रॉकेल टाकून जाळणाऱ्या आतेसासुला जन्मठेपराज्यात यावर्षी मॉन्सूनचे आगमन वेळेपूर्वीच झाले होते. जून महिन्याच्या सुरूवातीलाच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात मॉन्सूनने प्रगती केली होती. त्यानुसार जिल्ह्यात सुद्धा जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र पाऊस रुतला. दरम्यान आता पुन्हा पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यात गत तीन-चार दिवसांपासून अधून-मधून पाऊस होत आहे. हा पाऊस शेतीसाठी पोषक ठरत असल्याने शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट तूर्तास तरी टळले आहे. दुसरीकडे रखडलेल्या पेरण्यांनी सुद्धा गती पकडली आहे. कमी अधिक प्रमाणात होत असलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील जल सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात सुद्धा वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांवरील पाणी कपातीचे संकट ही तूर्तास टळले आहे.

हेही वाचा: प्रशासनाच्या बेपरवाईने बेशरमही लाजली; नागरिक लोळले चिखलात


असा आहे पाणीसाठ्याती बदल (टक्क्यात)
सिंचन प्रकल्प १० जुलै १३ जुलै
काटेपूर्ण २७.१३ ३२.६०
वान २९.७९ ३०.९७
निर्गुणा १४.७० २१.०१
मोर्णा ३२.३४ ३८.४५
उमा १५.७५ १५.७५

हेही वाचा: भाषण सुरु असतानाच अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा सौम्य झटका, प्रकृती स्थिर


तूर्तास संकट टळले
अकोला महानगरातील नागरिकांना बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील काटेपूर्णा सिंचन प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातनंतर पावसाने दडी मारल्याने धरणातील पाणी कमी होत होते. त्यामुळे महानगर वासियांना पाणीटंचाईचा समाना करावा लागेल, अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु कमी पावसाताच आता धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने सर्वांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

संपादन - विवेक मेतकर
Water reserves increased by six per cent in three days!

loading image