शिरपूर : ग्रामसचिव म्हणतात ‘मला माहित नाही’

तिर्थक्षेत्रावरील पाण्याची टाकी केली जमिनदोस्त; ग्रामपंचायतची उडवाउडवी उत्तरे
water tank pilgrimage
water tank pilgrimagesakal

शिरपूर : शिरपूर जैन येथील जानगीर महाराज संस्थान हे सर्वधर्मीयांचे आराध्य दैवत आहे. या संस्थानला दुष्काळी परिस्थितीत गावातून पाणीपुरवठा करण्यासाठी बांधलेली पाण्याची टाकी जमिनदोस्त करण्यात आली. परंतू सदर टाकी पाडण्याबाबत ग्रामसचिवांना काहीच माहित नाही. तर सरपंच पती मात्र ग्रा.पं. ने ठराव घेतला असल्याचे सांगत आहे. ग्रामसचिवांना अंधारात ठेवून ठराव घेतला तरी कसा, असा संतप्त सवाल संस्थानच्या भक्ताकडून विचारला जात आहे.

१९९३-९४ मध्ये पावासाळा कमी झाल्यामूळे शिरपुरात पाणीटंचाई जाणवत होती. म्हणून तत्कालीन सरपंच विकास चोपडे यांनी तत्कालीन आमदार सुभाष झनक यांच्याकडे पाठपुरावा करुन ती पाण्याची टाकी बांधून घेतली होती. जानगीर महाराज संस्थानला यात्रेच्या काळात पाणीपुरवठा करण्यासाठी व तसेच वार्ड क्र. ४ ची तहान भागविण्यासाठी सदर टाकीसाठी शासनाने निधी उपलब्ध करुन दिला होता. तसेच गुराढोरांना पाणी पिण्यासाठी संस्थानने हौद बांधला होता. त्या हौदात या टाकीतून पाणी पुरवले जात होते. शिवाय महाशिवरात्रीच्या वेळी यात्रेतील दुकानांना याच टाकीतील पाणी देण्यात येत होते.

विशेष म्हणजे ही टाकी रस्त्याच्या एका कडेला बांधली होती. त्यामुळे या टाकीचा आजपर्यंत वाहातुकीला कोणताच अडथळा झाला नव्हता. तरी सुद्धा एकेकाळी सर्वांना पाणी पाजणारी ही पाण्याची टाकी ग्रामपंचायतने का पाडली, सदर टाकी पाडण्याबाबत कोणाची तक्रार होती का, तक्रार अर्ज सभेपुढे मांडला होता का, गावात चोहीकडे अतिक्रमण वाढले आहे. ग्रामपंचायतच्या नाकासमोर पक्के बांधकाम झाले आहे. ते सर्व अतिक्रमण का पाडले नाही, सरकारी निधीतून बांधलेली पाण्याची टाकी संस्थानला न सांगता व ग्रामसचिवाला अंधारात ठेवून का पाडली, असे अनेक प्रश्न संस्थानचे भक्त विचारत आहेत. परंतू ग्रामपंचायत उडवाउडवीची उत्तरे देत आहे. त्यामुळे संस्थानच्या भक्त मंडळीत संतापाची लाट पसरली आहे. हे प्रकरण पेटण्यापूर्वीच वरिष्ठांनी चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भक्त मंडळींकडून करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com