
महाराष्ट्रातील कळसुबाई शिखर हे सर्वोच्च उंच शिखर असून या शिखरावर जाण्याचे स्वप्न हे प्रत्येक दिव्यांगांचे असते. अनोखे सामर्थ्य असणाऱ्या दिव्यांगांना यातून ऊर्जा मिळते. यामध्ये जिल्ह्यातील तीन दिव्यांगांचा सक्रिय सहभाग होता.
अकोला : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरात जोरदार तयारी सुरु होती. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आपल्या जवळच्या माणसांसोबत अनेकांनी खास प्लॅनही आखले होते. अनेकांनी वेगवेगळे संकल्पही केले. मात्र, अकोल्याच्या तीन दिव्यांगांनी याच दिवसाला केलं ते अनेकांना अचंबित करणारं होतं.
अकोल्याचे बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील कळसुबाई शिखर हे सर्वोच्च उंच शिखर असून या शिखरावर जाण्याचे स्वप्न हे प्रत्येक दिव्यांगांचे असते. अनोखे सामर्थ्य असणाऱ्या दिव्यांगांना यातून ऊर्जा मिळते. यामध्ये जिल्ह्यातील तीन दिव्यांगांचा सक्रिय सहभाग होता. आंतराष्ट्रीय खेळाडू सुनील भाऊराव वानखडे (उरळ,बु ता. बाळापूर), सचिन मनोहर मानकर (अकोला) व पलश सुभाष यादव (अकोला) या तीन दिव्यांग अकोल्यातील खेळाडूंनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई- सकाळचे ऍप
शिवुर्जा प्रतिष्ठान, औरंगाबाद यांनी ३१ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या या उपक्रमात महाराष्ट्रातील जवळपास ७० दिव्यांग सहभागी झाले होते. सर्वप्रथम ३१ डिसेंबर रोजी कळसुबाईच्या पायथ्याशी जहांगीरदारवाडी या गावात मचू खाडे याच्या घरी सर्व एकत्र आले. दुपारनंतर कळसुबाई शिखर चढाईला सुरुवात करण्यात आली. ‘शिवाजी महाराज की जय’, ‘कळसुबाई माते की जय’, अशा घोषणा देत, सर्व दिव्यांग एकमेकांना आधार देत रात्री सात वाजतापर्यंत कळसुबाई शिखर माथा गाठला. एव्हाना रात्रीची थंडी वाढू लागली होती. कडाक्याच्या थंडीत रात्रभर तंबूत मुकाम ठोकून १ जानेवारीच्या पहाटे पहाटे कळसुबाई मातेचे दर्शन घेऊन या तिघांनी आपला संकल्प पूर्ण केला.
यानंतर नवीन वर्षाच्या नव उगवत्या सूर्याचे दर्शन घेऊन नवीन वर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. सकाळी 10 वाजता शिखर उतरण्यास सुरवात करण्यात आली आणि अवघ्या तीन तासात जहागिरवाडी गाव गाठले. या मोहिमेत सहभागी सर्व दिव्यांगना प्रतिष्ठानातर्फे प्रमाणपत्र व पदक प्रदान करण्यात आले. अशा मोहिमांसाठी जिल्ह्यातील दिव्यांग गिर्यारोहक वाढावेत, अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी/ अधिकार संघटना, अकोला जिल्हा संघटक दिव्यांग क्रीडा मार्गदर्शक तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू सुनील वानखडे यांनी केले आहे.