esakal | गावावर शोककळा; शेततळ्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

गावावर शोककळा; शेततळ्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

गावावर शोककळा; शेततळ्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुशीरखान कोटकर

देऊळगाव राजा (जि.बुलढाणा) ः गावानजीकच्या शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे आज (ता.७) सकाळी अकराच्या दरम्यान घडली या हृदयद्रावक घटने नंतर वाकी गावासह बनसोडे कुटुंबावर शोककळा पसरली असून समाजमन हेलावून गेले आहे दरम्यान अंढेरा पोलिसांनी याबाबत मार्ग नोंदविला आहे (The unfortunate death of two children by drowning in a farm pond)

हेही वाचा: पार्किंगची व्यवस्था नसताना वाहनांची साेडली हवा

तालुक्यातील वाकी बुद्रुक शिवारात घडलेल्या सदर घटनेबद्दल प्राप्त माहितीनुसार वाकी येथील मदन आप्पाजी काकड यांच्या शेतात मोठे शेततळे बांधलेले असून गावातील युवक सदर शेततळ्यात पोहण्यासाठी जातात आज सकाळी परिसरातील अनेक मुले व युवक सदर शेततळ्यात पोहण्याचा आनंद घेत होते शाळांना सुटी असल्याने अनेक मुले पोहत असताना शेततळ्यातील गाळात पाय अडकून एक मुलगा पाण्यात बुडू लागला इतर युवकांनी पाहिले अन् वाचवण्यासाठी काही मुलांनी झेप घेतली.

हेही वाचा: दोन गटातील एकूण सहा गंभीर जखमी, दोन ट्रॅक्टर नदीत फेकले

यादरम्यान आरडाओरड केल्याने नजीकच्या शेतात काम करीत असलेले दोन युवक शेततळ्या च्या दिशेने धावले तोपर्यंत दोन मुले पाण्यात बुडाले होते तर तिघांना त्यांनी शेततळ्या बाहेर ओढून आणले नंतर पाण्याखाली बुडालेल्या दोघा मुलांना बाहेर काढण्यात आले घटनेची माहिती गावापर्यंत पोहोचल्यानंतर अनेकांनी शेततळ्या कडे धाव घेतली

हेही वाचा: खेड्यापाड्यात काम करणाऱ्या युवकाला मिळाली लंडनमध्ये स्कॉलरशिप

सदर घटनेत सोहम परमेश्वर बनसोडे (वय १२) याचा जागीच मृत्यू झाला तर अमरदीप शंकर बनसोडे (वय १४)यास देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासाअंती त्यास मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस ठाण्याचे एएसआय मोरसिंग राठोड घटनास्थळी पोहोचले दोघे मृतक एकाच कुळातील होते तर अमर हा आई-वडिलांचा एकुलता मुलगा होता हृदय पिळवटून टाकणाऱ्या सदर घटने मुळे नातेवाईकांनी एकच कल्लोळ केला तर या दुर्दैवी घटनेने वाकी बुद्रुक सह बनसोडे कुटुंबावर शोककळा पसरली असून समाजमन हेलावून गेले आहे.

हेही वाचा: जिल्हा परिषदेच्या राजकारणात विधानसभेची मोर्चेबांधणी

दोघे युवक देवदूत ठरले-

पोहत असताना अचानक दोन युवक पाण्यात बुडत असल्याने शेत तलावात पोहणाऱ्या इतर मुलांनी मदतीसाठी आरडाओरड केल्याने नजीकच्या शेतात काम करणऱ्या राम कारभारी काकड व महादू दत्तू बनसोडे या युवकांनी धावत येउन लगेच उडी घेतली व शेत तलावात बुडणाऱ्या तीन युवकांना बाहेर काढले त्यांनी क्षणार्धात तलावात उडी घेऊन तीन मुलांचे प्राण वाचविल्याने ते दोघे देवदूत ठरले अशा भावना गावकर यांनी व्यक्त केल्या तर अवघे काही मिनिट उशीर झाल्याने त्या दोघा मृतकाना वाचवु शकलो नसल्याची खंत राम व महादू यांच्या मनात सलत आहे.

संपादन - विवेक मेतकर

The unfortunate death of two children by drowning in a farm pond

loading image
go to top