आरोग्य यंत्रणा हादरली; ‘म्युकर मासोसीस’मुळे महिलेचा झाला मृत्यू

‘म्युकरमासोसीस’चा जिल्ह्यात शिरकाव
Woman dies of mucor-mycosis at Washim
Woman dies of mucor-mycosis at WashimFile Photo

वाशीम ः आधीच कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने जिल्ह्यात मृत्यूचे तांडव सुरू असतानाच आता ‘म्युकर मायसोसीस’ (mucor-mycosis) या आजाराने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. हा आजार कोरोना संसर्ग टळल्यानंतर होत असून, तो धोकादायक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. Woman dies of mucor-mycosis at Washim

रिसोड तालुक्यातील मोप येथील भागाबाई शिरभाऊ (वय ६२) या महिला कोरोना बाधित असल्याने वाशीम येथील लेडी हार्डिंग येथे उपचार सुरू होते, मात्र मंगळवारी (ता.११) त्यांना डोळ्याचा त्रास वाढला असता, नेत्रतज्ज्ञांनी तपासणी केली असता, ‘म्युकरमासोसीस’ असल्याचे निदान झाले आणि रात्री उशिरा महिलेचे निधन झाले. ‘म्युकरमायसोसीस’ या आजाराचा रुग्ण नागपूर नंतर वाशीम जिल्ह्यात आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे. ‘म्युकरमासोसीस’मुळे एका ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना वाशीम मधील लेडी हार्डिंगमध्ये उपचार सुरू असताना घडली आहे.

Woman dies of mucor-mycosis at Washim
पॉझिटिव्ह रुग्ण २४ तासात झाला निगेटिव्ह!

वाशीम जिल्ह्यातील ‘म्युकरमायकोसीस’मुळे मृत्यू झाल्याची पहिलीच घटना असून, या घटनेमुळे जिल्ह्यात एकचं खळबळ उडाली आहे. दरम्यान वाशीम जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढत असतानाच ही नवीन ‘म्युकरमासोसीस’मुळे महिला दगवल्याने आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ‘म्युकरमायसोसीसर या आजारावर उपचारासाठी मदतीची घोषणा केली असून, हा उपचार कोणत्याही रुग्णालयात मोफत होणार आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना हा आजार होत असून, लक्षणे आढळून आल्यास त्वरीत उपचार सुरू झाले, तर या आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश येवू शकते, असे आरोग्य तज्ज्ञांकडून आवाहन करण्यात येत आहे.

Woman dies of mucor-mycosis at Washim
न्युमोनियाच्या नावाखाली कोरोना रुग्णांवर उपचार

रिसोड तालुक्यातील मोप येथील भागाबाई शिरभाऊ (वय ६२) या महिला कोरोना बाधित असल्याने, वाशीम येथील लेडी हार्डिंग येथे उपचार सुरू होते, मात्र मंगळवारी त्यांना डोळ्याचा त्रास वाढला असता, नेत्रतज्ज्ञांनी तपासणी केली असता, ‘म्युकरमायसोसीस’ असल्याचं निदान झालं आणि रात्री उशिरा त्यांचं निधन झालं आहे. सध्यातरी दुसरा रुग्ण जिल्ह्यात नसल्याची माहिती आहे.

-डॉ. मधुकर राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक.

काय आहे ‘म्युकरमायसोसीस’?

ज्या रुग्णाला कोविड आजार होतो त्यानंतर तो रुग्ण कोविड मुक्त झाला, तरीही काही रुग्णांमधे बुरशीजन्य आजाराची वाढ होते. त्यालाच ‘म्युकरमायसोसीस’ म्हणतात. ही बुरशीची वाढ शरीरात कोठेही होवू शकते. कोविड रुग्णावर उपचार करताना ‘म्युकरमायकोसीस’ बाबतही उचाराचा समावेश केला, तर यामध्ये धोक्याची पातळी कमी होते.

डाॅ.गोपाल जंगले पाटील, सेक्युरा हॉस्पिटल, वाशीम.

संपादन - विवेक मेतकर

Woman dies of mucor-mycosis at Washim

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com