गुन्हेगारांची कुंडली गोळा करण्याचे काम सुरू 

भगवान वानखेडे 
Saturday, 8 August 2020

गुंडागर्दी दादागिरी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या रडारवर 

अकोला ः शहरासह जिल्ह्यात दादागिरी, गुंडगिरी करीत खंडणी वसूल करणे तसेच व्यापाऱ्यांकडून तोड्या करणाऱ्यांवर आता जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी करडी नजर ठेवणे सुरू केले आहे. अशा गुंडगिरीवाल्यांची कुंडली गोळा करण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केले असून, हे सर्व गुंड आता स्थानिक गुन्हे शाखेच्या रडारवर आले आहेत.

झोपडपट्टी दादा तसेच रोडसाईड रोमिओ आणि टोळ्या तयार करून खंडणी वसूल करणारे तसेच शस्त्राच्या धाकावर लूटमार करणारे आणि दादागिरीच्या भरवशावर व्यापारी उद्योजक यांच्याकडून खंडण्या वसूल करणारे सध्या पोलिस अधीक्षकांच्या रडारवर आहेत. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या निर्देशांवरूनच स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांनी शहरासह जिल्ह्यातील गुंडगिरी करणाऱ्यांची कुंडली गोळा करण्याचे काम सध्या सुरू केले आहे. त्यांच्याविरुद्ध दाखल असलेले विविध गुन्हे तसेच शिक्षा झालेली असतानाही जामिनावर बाहेर असलेल्या गुंडांची कुंडली गोळा करून त्याचे प्रस्ताव शहर पोलिस उपअधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांच्या मार्फत पोलिस अधीक्षकांकडे सादर करण्यात येत आहेत. यानुसारच आतापर्यंत तीन आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, यापुढे या गुंडाची कुंडली गोळा करून त्यांच्याविरुद्ध स्थानबद्धता जिल्ह्यातून हद्दपार करणे तसेच मकोका यासारख्या कारवाई करण्याचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे गुंडगिरी करणाऱ्यांची आता चांगलेच धाबे दणाणले आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The work of collecting horoscopes of criminals continues