सावधान....यंदा गुलाबी बोंडअळीचे संकट दाट; योग्य व्यवस्थापन करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

अनुप ताले
सोमवार, 1 जून 2020

‘गुलाबी बोंडअळी’ म्हणजे कापूस पिकावरील आतापर्यंतचे सर्वात मोठे संकट ठरले आहे. या संकटापासून कापूस उत्पादकांना वाचविण्यासाठी, गुलाबी बोंडअळीसह रस शोषण करणाऱ्या अळीला प्रतिकारक्षम असणारे बीटी कपाशी वाण तयार करण्यात आले होते. परंतु, गुलाबी बोंडअळीने स्वतः मध्ये बदल करून बीटी कपाशीवरही 2017 मध्ये हल्ला चढविला आणि संपूर्ण कापूस हंगाम उद्‍ध्वस्त केला. त्यानंतर सांघिक प्रयत्नातून गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र विस्कळीत करण्यात यश आले आणि 2018 व 2019 मध्ये कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रित राहाला. परंतु, २०१९ मध्ये कापूस हंगाम लांबला. उशिरा पेरणी व उशिरापर्यंत कापूस वेचणी सुरू होती. मे मध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी शेतशिवारात पऱ्हाटीचे पीक उभे होते. शिवाय अजूनही कापूस खरेदी प्रक्रिया सुरू असून, शेतकऱ्यांच्या घरात आणि जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस पडून आहे. त्यामुळे शेतात व गावांमध्येसुद्धा गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र विस्कळीत होऊ शकले नाही.

अकोला : शेतकऱ्यांच्या घरात व जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस पडून असल्याने व गेल्या वर्षीचा कापूस हंगाम लांबल्याने गुलाबीं बोंडअळीचे जीवनचक्र विस्कळीत होऊ शकले नाही. त्यामुळे गुलाबी बोंडअळीने 2017 मध्ये केलेल्या हल्ल्याची यावर्षी पुनरावृत्ती होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी आतापासूनच योग्य व्यवस्थापन करून उपाययोजनांसाठी तत्पर राहावे, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.

 

‘गुलाबी बोंडअळी’ म्हणजे कापूस पिकावरील आतापर्यंतचे सर्वात मोठे संकट ठरले आहे. या संकटापासून कापूस उत्पादकांना वाचविण्यासाठी, गुलाबी बोंडअळीसह रस शोषण करणाऱ्या अळीला प्रतिकारक्षम असणारे बीटी कपाशी वाण तयार करण्यात आले होते. परंतु, गुलाबी बोंडअळीने स्वतः मध्ये बदल करून बीटी कपाशीवरही 2017 मध्ये हल्ला चढविला आणि संपूर्ण कापूस हंगाम उद्‍ध्वस्त केला. त्यानंतर कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र इतर संस्थांनी गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, प्रतिबंधात्मक व्यवस्थापन याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. शेतकऱ्यांनी सुद्धा एकात्मिक कीड व्यवस्थापन करून सांघिक प्रयत्न केले. त्यामुळे गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र विस्कळीत करण्यात यश आले आणि 2018 व 2019 मध्ये कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रित राहाला. परंतु, 2019 मध्ये कापूस हंगाम लांबला. उशिरा पेरणी व उशिरापर्यंत कापूस वेचणी सुरू होती. मे मध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी शेतशिवारात पऱ्हाटीचे पीक उभे होते. शिवाय अजूनही कापूस खरेदी प्रक्रिया सुरू असून, शेतकऱ्यांच्या घरात आणि जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस पडून आहे. त्यामुळे शेतात व गावांमध्येसुद्धा गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र विस्कळीत होऊ शकले नाही आणि त्याचा परिणाम म्हणून येत्या हंगामात कपाशीवर गुलाबी बोंडअळी जोरदार हल्ला चढवू शकते, अशी शक्यता कृषी अभ्यासक व कृषी तज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली आहे.

 

हे ही वाचा : शंभर कोटीचा मामला, सरकारी तिजोरीतच थांबला
 

योग्य व्यवस्थापन करा
गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र विस्कळीत करण्यासाठी फरदळीचा कापूस न घेण्याचे व मॉन्सूनपूर्व कापूस लागवड न करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. परंतु गेल्या वर्षी कापूस पेरणी उशिरा झाल्याने, उशिरापर्यंत कापूस वेचणी सुरू होती. शिवाय शेतकऱ्यांच्या घरात व जिनिंगमध्ये कापूस असून, लवकरच खरिपातील कापूस लागवडीला सुरुवात होईल. त्यामुळे गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र विस्कळीत होणे कठीन असून, 2017 ची पुनरावृत्ती सुद्धा होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी आवश्यक व्यवस्थापन करावे व अधिक माहितीसाठी कृषी विद्यापीठाशी संपर्क साधावा.
- डॉ.धनराज उंदीरवाडे, किटकशास्त्र विभाग प्रमुख, डॉ.पंदेकृवि अकोला

 

हे ही वाचा : अरे बापरे! सर्वोष्ण शहरांच्या यादीत या शहराचे नाव; जणू काही जगातील उष्णतेचे केंद्र बनन्याकडे...

 

...म्हणून बियाणे विक्री उशिरा करण्याचे आवाहन
कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र विस्कळीत करणे आवश्यक आहे. त्यासाठी फरदळ न घेण्याचा व मॉन्सूनपूर्वी कपाशी लागवड टाळण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले होते. परंतु, लवकर बियाणे उपलब्ध झाल्यास सिंचनाची व्यवस्था असलेले शेतकरी मॉन्सूनपूर्व कापूस लागवड करतात. ते टाळण्यासाठी 25 मे पूर्वी बियाणे विक्री करण्याची परवाणगी देवू नये, यासाठी शासनाकडे मागणी केली होती. शासनाने सुद्धा मागणी करून 25 मे पूर्वी बियाणे विक्री करण्यास मनाई केल्याचे डॉ.उंदीरवाडे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This year, there may be an outbreak of pink bollworm