16 Acre Baran Land Develped By Solar Pump Ajay Tendulkar Success Story
16 Acre Baran Land Develped By Solar Pump Ajay Tendulkar Success Story 
अ‍ॅग्रो

सौर पंपामुळे 16 एकर कातळावर नंदनवन 

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - कोकणात कातळावर नंदनवन फुलवण्याचे आव्हान रत्नागिरी तालुक्‍यातील डोर्ले येथील शेतकरी अजय तेंडुलकर यांनी लिलया पेलले आहे. अटल सौर कृषी पंप योजनेचा पुरेपुर उपयोग करत साडेतीन वर्षांपूर्वी सोळा एकरवर लागवड केलेल्या आंबा, काजू, नारळाच्या बागेतून लाखो रुपयांचे उत्पन्न घेण्यास सुरवात केली आहे. वीजेच्या बचतीचा संदेश तेंडुलकर यांनी दिला आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात पहिला सौर कृषी पंप तेंडुलकर यानी घेतला. मुंबईत व्यवसायात असले तरी अजय यांना गावच्या मातीची ओढ गप्प बसू देत नव्हती. 2005 साली ते गावी परतले. पहिल्याच वर्षी बॅंकेकडून अडीच लाखाचे कर्ज घेत पाच एकर जागेवर आंबा, काजू आणि नारळाची लागवड केली.

2016 साली त्यांनी दुसऱ्या टप्प्यात डोर्ले गावाच्या वेशीवरील सोळा एकरची जागा विकसित केली. कातळावर नंदनवन फुलवण्यासाठी पाण्याची गरज होती. महावितरणकडे प्रस्तावही दिला; परंतु मुख्य डीपीपासून सुमारे पाच खांब टाकल्यानंतर वीजेचा पुरवठा सुरु होणार होता. त्यासाठी किमान सव्वा लाख रुपयांचा खर्च होता. त्याचवेळी सौर कृषी पंप योजनेचा प्रसार सुरु होता. अटल सौर कृषीपंप योजनेतून त्यांना सौर पंप मिळाला.सबसिडीवर दोन युनिट सोळा एकरच्या बागेत लावली.

तीन एचपी क्षमतेचा पंप त्यावर दिवसभर चालतो. एका युनिटसाठी फक्‍त 22 हजार 500 रुपये भरावे लागले. सौर कृषी पंपाचा जिल्ह्यातील हे पहिले युनिट होते. त्या युनिटमधून दिवसाला तीन किलोवॅट वीजेची निर्मिती होते. त्यावर सकाळी 7 ते सायंकाळी 4.30 पर्यंत दोन पंप सुरू राहतात. तीन वर्षानंतर उत्पन्न सुरु झाले असून दीडशे काजूच्या झाडातून तिसऱ्याच वर्षी 450 किलो बी मिळाली. दीडशे पेटी आंबा मिळाली असून नारळही लागत आहे. 

चार जणांनी घेतले सौरपंप 

अजय यांनी खाडीलगत असलेला चार एकर खाजण जमिनीचा भाग विकसित केला. त्यात नारळाची लागवड केली आहे. त्या ठिकाणी सौर युनिट बसवले आहे. डोर्ले गावातील आणखीन चार शेतकऱ्यांनी सौर पंप युनिट घेतली असून सुमारे चाळीस ते पन्नास एकर कातळ फळबाग लागवडीखाली आला. अजय यांच्या प्रयोगशीलतेमुळे सौर पंपाचा यशस्वी प्रयोग अन्य शेतकरी करु लागले आहेत.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT