Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

अडिच वर्षापूर्वी आशियाई विकास बँक (एशियन डेव्हल्पमेंट बँक) व राज्य सरकारच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅगनेट) प्रकल्पातंर्गत पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या विद्यमाने कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पाचोड (ता.पैठण) येथील उपबाजारपेठेत १५ कोटी २६ लाख रुपये खर्चाचे राज्यातील पहिले मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज युनिट उभारणीचे हाती घेण्यात आलेले काम अंतिम टप्प्यात आले असून हे युनिट मे महिन्याअखेर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Sambhajinagar
Sambhajinagar sakal

पाचोड : अडिच वर्षापूर्वी आशियाई विकास बँक (एशियन डेव्हल्पमेंट बँक) व राज्य सरकारच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅगनेट) प्रकल्पातंर्गत पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या विद्यमाने कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पाचोड (ता.पैठण) येथील उपबाजारपेठेत १५ कोटी २६ लाख रुपये खर्चाचे राज्यातील पहिले मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज युनिट उभारणीचे हाती घेण्यात आलेले काम अंतिम टप्प्यात आले असून हे युनिट मे महिन्याअखेर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मराठवाडयातील मोसंबीचे लागवडीखालील क्षेत्र व त्याची गुणवत्ता, थेट बाजारपेठेतील होणारी उत्पादकांची हेळसांड पाहुन राज्या तील सर्वात मोठे व प्रथम पंधरा कोटी २६ लक्ष रुपये खर्चाच्या या मॅगनेट प्रकल्प (फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्र) उभारणीचे काम पाचोडला राष्ट्रीय महामार्गा लगत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन एकर जागेवर उभारण्यात येत आहे. या प्रकल्प उभारणीस ता. २७ नोव्हेबर २०२१ रोजी प्रारंभ झाला होता.

येथे प्रकल्प उभे राहिल्यानंतर फलोत्पादन पिकाच्या (लागवडीपासून ते विक्रीपर्यंत) मूल्य साखळी विकासाचे सर्व प्रक्रिया येथे होणार आहे. एकूण एक हजार कोटी रुपये किमती चा हा प्रकल्प शासनाकडून राज्यभरात राबविण्यात येणार आहे. याचा पहिला टप्पा पाचोड येथे तर दुसरा प्रकल्प बारामती येथे उभारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सत्तर टक्के रक्कम (७०० कोटी) एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून अर्थसहाय्य मिळणार आहेत. पुढील सहा वर्षापर्यंत राज्यात या प्रकल्पाची पुर्णतः अंमलबजावणी होणार आहे. पणन मंडळाने २९ वर्षाकरीता पाचोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारपेठेच्या मालकीची दोन एकर जागा भाडेपट्टयाने घेऊन हा प्रकल्प उभारला.

Sambhajinagar
Sambhaji Nagar News : शालेय स्तरावरच आता शेतीचे धडे ; कार्यानुभव विषयांतर्गत कृषी घटकांचे दिले जाणार ज्ञान

या उभारण्यात आलेल्या प्रकल्पात मोसंबी व शेतमालाची विगतवारी करण्यासाठी प्राथमिक प्रक्रिया व सुविधा केंद्र शॉर्टिंग ग्रेडिंग वॅक्सिंग,पॅकिंग व कोल्ड स्टोरेज उभारण्यात आले आहे. ज्यात प्रति तास १५ मेट्रिक ग्रेडिंग व पॅकिंग क्षमता असणार आहे.शेतमालाचे तापमान कमी करण्यासाठी सहा मेट्रीक टन प्रति बॅच सहा तास प्रमाणे 'प्रिकुलिंग'ची क्षमता असून बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेल्या मालास अपेक्षीत दर न मिळाल्यास हा शेतमाल काही दिवस टिकवून ठेवण्यासाठी २५ मेट्रीक टनाचे चार चेंबर एकूण १०० मे. टनाचे कोल्ड स्टोरेज (शितगृह) उभारण्यात आले आहे. प्रांगणात ६० मेट्रीक टन क्षमतेचा भुईकाटा, शेतकरी - व्यापाऱ्यासाठी प्रधानगृह, आर ओ प्लॅन्टची उभारणी करण्यात आली आहे. एकंदर या प्रकल्पातंर्गत प्रतिदिवस २५० ते ३०० मेट्रीक टन मोसंबीची उलाढाल होणार आहे.

उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पास राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम,सरव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक विनायक कोकरे, अतिरीक्त प्रकल्प संचालक अमोल यादव, उपसरव्यव स्थापक (प्रकल्प) महेंद्र पवार, जी.सी. वाघ, अजित हैशी, अरुण नादरे, गणेश पाटील आदींनी भेट देउन पाहणी केली व सदरील प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करणे बाबत संबंधितास सुचना दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com