अ‍ॅग्रो

नगर जिल्ह्यात साखर उताऱ्यात घट;४५ लाख टन उसाचे गाळप

प्रतिनिधी

नगर - नगर जिल्ह्यात यंदा गाळप हंगामात २३ पैकी २१ कारखाने सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ४५ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. मात्र यंदाचा साखर उतारा गेल्या वर्षीपेक्षा कमीच आहे. असे असले तरी यंदाच्या साखर उताऱ्यात सहकारी साखर कारखान्यांपेक्षा खासगी कारखानेच पुढे आहेत.

जिल्ह्यात सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा सरासरी ८.५ टक्के असून, खासगी साखर कारखान्यात ८.४२ आहे. तर जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ८.३१ आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ११.५० एवढा होता. 

जिल्ह्यात असलेल्या १४ सहकारी व ९ खासगी साखर कारखान्यांपैकी १३ सहकार व ८ खासगी साखर कारखाने सुरू झाले आहेत. आतापर्यंत ४५ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यात सहकारी कारखान्यांनी ३० लाख, तर खासगी कारखान्यांतून १५ लाख टन गाळप झाले आहे. दैनंदिन गाळपात मात्र खासगीच आघाडीवर आहेत. आतापर्यंत सर्वाधिक साडेपाच लाख टन उसाचे अंबालिका कारखान्याने गाळप केले आहे. शेतकऱ्यांना दिला जाणारा उसाचा दर साखर उताऱ्यावर ठरतो. यंदाचा साखर उतारा मात्र गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे. सध्या साखर उतारा कमी असला तरी कारखान्याचा गाळप हंगाम संपतेवेळी सरासरी उताऱ्यात वाढ होणार असल्याचे बोलले जात असले, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर उतारा कमी असल्याने पुढील वर्षी दरात फटका बसू शकतो असे जाणकारांचे मत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यंदा आतापर्यंतच्या साखर उताऱ्यात सर्वाधिक १०.५ टक्के एवढा साखर उतारा नागवडे (श्रीगोंदा) कारखान्याचा आहे. खासगीमध्ये सर्वाधिक ९.१९ टक्के साखर उतारा अंबालिका साखर कारखान्याचा आहे. जिल्ह्यात सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा सरासरी ८.५ टक्के असून, खासगी साखर कारखान्यात ८.४२ आहे. तर जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ८.३१ आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ११.५० एवढा होता, असे प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातून सांगण्यात आले. 

कारखानानिहाय साखर उतारा पुढीलप्रमाणे 
(कंसात गतवर्षीचा साखर उतारा) - संजीवनी - ७.५१ (९.७०), शंकरराव काळे - ८.८२ (१०.७९), श्रीगणेश - ६.९६ (१०.५४), अशोक - ६.९९ (९.९३), शिवाजीराव नागवडे श्रीगोंदा - १०.०५ (११.३८), सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात - ८.७४ (१०.८०), विखे पाटील प्रवरा - ६.९९ (१०.९१), ज्ञानेश्वर - ९.०५, (९.९०), वृद्धेश्वर - ८.९१ (८.५५), मुळा - ८.४६ (९.८५), अगस्ती - ८.९४, (११.२१) केदारेश्वर - ७.१८(-), कुकडी - ९.२२ (११.१८), क्रांतीशुगर (पारनेर) - ९.१२, (१०.५०) पियुष (नगर तालुका) - ६.२७ (१०.४२) अंबालिका राशीन - ८.८५ (११.२१), गंगामाई - ७.३८ (९.६६), साईकृपा (१) - ९.०६, (१०.५०), प्रसाद शुगर - ९.१९ (१०.४०), जय श्रीराम - ७.८६ (१०.४०), युटेक शुगर - ८.३१ (९.९८).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT