Agriculture Department
Agriculture Department esakal
अ‍ॅग्रो

Satara : 14 कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाची धडक कारवाई; 'इतक्या' केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी केले रद्द

सकाळ डिजिटल टीम

शेतकऱ्यांनी शेतीमालाच्‍या अनुषंगाने तक्रारी नोंदविण्‍यासाठी मोबाईल क्रमांक ७४९८९२१२८४ येथे संपर्क साधावा, असे आवाहनही कृषी विभागातर्फे केले आहे.

सातारा : यंदाच्‍या खरीप हंगामाच्‍या (Kharif Season) पार्श्वभूमीवर अप्रमाणित बियाणे, खते, कीटकनाशके विक्री करणाऱ्या १४ कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाने (Agriculture Department) कारवाई केली आहे. कारवाईदरम्‍यान या कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्‍यात आले आहेत.

कारवाई झालेल्‍यांमध्‍ये ३ बियाणे विक्रेते, ९ खत विक्रेते व २ कीटकनाशक विक्रेत्यांचा समावेश असून, त्‍यापैकी २ खत विक्रेते व १ कीटकनाशक विक्रेत्याचे परवाने (Agricultural Service Centre) कायमस्वरूपी रद्द केल्‍याची माहिती कृषी विकास अधिकारी विजय माईनकर यांनी दिली.

खरीप हंगामाच्‍या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १२ भरारी पथकांमार्फत कृषी सेवा केंद्रांची तपासणी सुरू आहे. तपासणीदरम्‍यान बेकायदेशीर प्रकार आढळल्यास कृषी सेवा केंद्रावर तत्काळ कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले होते. त्यानुसार ही कारवाई केली.

जिल्ह्यात सद्यःस्थितीत रासायनिक खतांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात आहे. त्यामध्ये युरिया-१६ हजार ७६४ मेट्रिक टन, डीएपी १० हजार २८७ मेट्रिक टन, म्युरेट ऑफ पोटॅश ९२६ मेट्रिक टन, सुपर फॉस्फेट ९ हजार ३७५ मेट्रिक टन तसेच इतर संयुक्त खते २५ हजार ९२७ मेट्रिक टन या प्रमाणात उपलब्ध आहेत.

ज्वारी - ६‍८५ क्विंटल, बाजरी १ हजार ५९५ क्विंटल, भात १० हजार ७४९ क्विंटल, सोयाबीन १४ हजार ९६ क्विंटल, घेवडा २ हजार १७९ क्विंटल, मक्‍याचे ६ हजार ३४७ क्विंटल बियाणे उपलब्‍ध आहे. ऑफलाइन विक्री करणाऱ्या केंद्रांवर कारवाईचे संकेतही श्री. माईनकर यांनी पत्रकात दिले आहेत. शेतकऱ्यांनी शेतीमालाच्‍या अनुषंगाने तक्रारी नोंदविण्‍यासाठी मोबाईल क्रमांक ७४९८९२१२८४ येथे संपर्क साधावा, असे आवाहनही कृषी विभागातर्फे केले आहे.

पेरणीची घाई करू नका...

पाऊस लांबल्‍याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा (४ ते ५ इंच खोल) किंवा ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

USA vs PAK : युएसएने इतिहास रचला! मुंबईकर नेत्रावळकरची सुपर ओव्हरमध्ये सुपर बॉलिंग, पाकिस्तानचा पराभव

Ajit Pawar on Baramati Result: "बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य"; अजित पवारांची जाहीर कबुली

USA vs PAK : युएसएने पाकिस्तानचा निम्मा संघ शंभरच्या आत गुंडाळला; आफ्रिदीनं पार करून दिला 150 धावांचा टप्पा

Shooting World Cup : सरबज्योत सिंगचा सुवर्णवेध; जागतिक नेमबाजी स्पर्धेत बाजी

मोहोळच्या ज्येष्ठ नागरिकाला सोलापूरच्या रिक्षावाल्याने लुटले! कोंडीच्या पेट्रोल पंपावर नेऊन ‘फोन-पे’वरून काढले १.५ लाख रूपये

SCROLL FOR NEXT