अ‍ॅग्रो

यंदा कृषीचा विकासदर घसरणार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - भाजपचे सरकार २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर चार वर्षात पहिल्यांदाच एकूण देशांतर्गत उत्पन्नामध्ये (जीडीपी) घट होणार आहे. केंद्राने लागू केलेल्या जीएसटीचा परिणाम उत्पादन क्षेत्रावर झाला असून या क्षेत्राच्या वाढीला खीळ बसली. तसेच मागील वर्षी ४.९ टक्के असलेला कृषी संलग्न क्षेत्राचा विकास दर यंदा २.९ टक्केपर्यंत कमी होणार आहे. या दोन्ही क्षेत्रातील घटीमुळे २०१७-१८ या वर्षातील जीडीपी वाढ ६.५ टक्के राहील, असा अंदाज केंद्रीय संख्याशास्त्र व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जाहीर केला.

२०१६-१७ मध्ये हा जीडीपीचा दर ७.१ टक्के होता. म्हणजेच यंदा त्यात अर्ध्या टक्‍क्‍याहून अधिक घट नोंदली जाणे अपेक्षित आहे. कृषि व संलग्नक्षेत्रांच्या वाढीचा दर २.१ टक्के राहील असा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दरही कमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत औद्योगिक उत्पादनात देखील घसरण होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे.

संख्याशास्त्र मंत्रालयातर्फे २०१७-१८ मधील राष्ट्रीय प्राप्ती विषयक प्राथमिक अंदाजाची आकडेवारी जाहीर केली. त्यामध्ये हे तपशील देण्यात आले आहेत. ‘जीडीपी’मधील प्रत्यक्ष वाढीची आकडेवारी देताना संस्थेने ती वाढ १२९.८५ लाख कोटी रुपयांपर्यंत पोचेल, असे म्हटले आहे. २०१६-१७ मधील ‘जीडीपी’मधील प्रत्यक्ष वाढ १२१.९० लाख कोटी रुपयांची असल्याचा हंगामी अंदाज होता. एकूण मूल्यवर्धन किंवा ‘ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड’(जीव्हीए) म्हणजेच औद्योगिक क्षेत्राद्वारे उत्पन्न झालेल्या वस्तू व सेवा यांच्या मापनाच्या पध्दतीनुसार यामध्ये देखील १११.८५ लाख कोटी रुपयांवरुन ११८.७१ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ होणे अपेक्षित आहे. 

धान्योत्पादन घटणार 
कृषी, वनसंपदा, मत्स्यव्यवसाय यामध्ये २.१ टक्के वाढीची शक्‍यता आहे. गेल्या वर्षी या क्षेत्राने ४.९ टक्के वाढ नोंदवली होती. देशातील धान्योत्पादनातही घट होण्याची शक्‍यता आहे. २०१७-१८ मध्ये धान्योत्पादन १३.४६ कोटी टन अपेक्षित आहे. २०१६-१७ मध्ये ते १३.८५ कोटी टन होते.

महागाईचा चढता आलेख 
घाऊक किंमत निर्देशांकात पहिल्या सहा महिन्यांत २.६ टक्के वाढ झाली आहे. ग्राहक किंमत निर्देशांकात या सहा महिन्यांच्या कालावधीत ३ टक्के वाढ झाली. जीवनावश्‍यक किंवा दैनंदिन गरजेच्या वस्तूंमध्ये झालेल्या महागाईचे प्रतिबिंब या टक्केवारीत आहे.

शेती व संलग्न क्षेत्राचा विकास दर यंदा २.१ टक्के राहणार आहे. २०१६-१७ मध्ये त्या आधीच्या दोन वर्षातील दुष्काळामुळे विकास दर उच्चांकी पातळीवर होता. मात्र यंदा ती स्थिती राहणार नाही. 
- टी. सी. ए. अनंत, मुख्य, संख्याशास्त्रज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT