अ‍ॅग्रो

डाळिंबाचा खर्चही निघणे अवघड

सकाळवृत्तसेवा

सांगली - जिल्ह्यात मृग हंगामातील डाळिंबाची काढणी सुरू झाली आहे. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ तालुक्‍यात डाळिंबाच्या खरेदी साठी व्यापारी दाखल झाले आहेत. मात्र, डाळिंबाच्या दरात गेल्या महिनाभरात वाढच झाली नाही. डाळिंबाला प्रति किलोस ३० ते ४० रुपये असा दर मिळत आहे. डाळिंबाला घातलेला खर्च ही मिळणे मुश्‍कील असल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. निर्यातक्षम डाळिंबाचे दर वाढले असल्याचे व्यापारी सांगत आहेत, पण निर्यातक्षम डाळिंबाचेही दर वाढलेले नाहीत. त्यामुळे करायचे काय असा प्रश्‍न डाळिंब उत्पादकांच्या समोर निर्माण झाला आहे. 

जिल्ह्यात सुमारे सुमारे ८ हजार हेक्‍टर डाळिंबाचे क्षेत्र आहे. त्यापैकी जत तालुक्‍यात ३ हजार ५०० तर आटपाडी तालुक्‍यात ३ हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. बदलते वातावरण, तेलकट रोगाचा प्रादुर्भाव, पाण्याची कमतरता यातून जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा जगवल्या आहेत.

गेल्या हंगामात डाळिंबास ६० ते ८० रुपये असा दर होते. यंदाच्या हंगामात डाळिंबाचे दर वाढील अशी आशा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्यात होती. मात्र, डाळिंबाचे दर खालावले होते. हंगाम सुरू होताना दरात सुधारण होईल अशी चर्चा व्यापारी आणि शेतकऱ्यांच्यादेखील सुरू होती. मात्र, हंगाम सुरू होऊन महिना होत आला तरीदेखील डाळिंबाच्या दरात वाढ झाली नाही. यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.

आटपाडी तालुक्‍यात दरवर्षी निर्यातक्षम डाळिंबाच्या क्षेत्रात वाढ होते आहे. तालुक्‍यातून सुमारे ३० ते ३५ टक्के डाळिंबाची निर्यात होते. गेल्यावर्षी निर्यातक्षम डाळिंबाचे दर ८० रुपये प्रति किलोस होते, अशी माहिती तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी दिली. मात्र यंदाच्या हंगामात निर्यातक्षम डाळिंबाचे दर ४० रुपये प्रति किलोस आहेत. त्यामुळे डाळिंबाला घातलेले पैसे मिळणे कठीण झाले आहे. डाळिंब उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा कर्जाचा आधार घ्यावा लागणार अशी चर्चा डाळिंब उत्पादकांमध्ये सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT