अ‍ॅग्रो

सोयाबीन उत्पादन वीस टक्क्यांनी घटणार

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - पीकक्षेत्रात घट झाल्याने यंदा (२०१७-१८) सोयाबीनचे उत्पादन २० टक्क्यांनी घटण्याची शक्यता अाहे. गेल्या वर्षी ११.४९ दशलक्ष टन सोयाबीन उत्पादन झाले होते. यंदा ते ९.१५ दशलक्ष टनांपर्यंत खाली येईल, असा अंदाज सोयाबीन प्रोसेसर्स असोशिएशनने (सोपा) व्यक्त केला अाहे.

मध्य प्रदेश अाणि महाराष्ट्र या प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांतील पीकक्षेत्रात घट झाली अाहे. त्यामुळे यंदा उत्पादन घटण्याची चिन्हे दिसत अाहेत. राजस्थान, अांध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, छत्तीसगड अाणि गुजरात अादी राज्यांमध्येही सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. सोयाबीन हे खरिपातील महत्त्वाचे पीक असून, एकूण तेलबिया उत्पादनात सोयाबीनचा वाटा ४० टक्के अाहे. मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादन यंदा प्रतिहेक्टरी ९०५ किलोपर्यंत खाली येण्याची शक्यता अाहे. गेल्या वर्षी सोयाबीनची प्रतिहेक्टरी उत्पादकता १,०५८ किलो एवढी होती. तर महाराष्ट्रातील उत्पादन प्रतिहेक्टरी १,१०२ किलोवरून ९२५ किलोपर्यंत घटण्याचा अंदाज अाहे.

कापूस पिकाला किफायतशीर दर मिळत असल्याने यंदा शेतकरी सोयाबीन पिकाकडून कापूस पिकाकडे वळले असल्याचे चित्र दिसत अाहे. यंदा देशात सप्टेंबरअखेरपर्यंत १०५ लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली अाहे. गेल्या वर्षी ११४ लाख हेक्टरवर पीकक्षेत्र होते, अशी माहिती ‘सोपा’ने दिली अाहे. 

एकूण तेलबिया उत्पादनातही घट
मध्य प्रदेशात यंदा तेलबिया उत्पादन ४.५४ दशलक्ष टन होण्याचा अंदाज अाहे. गेल्या वर्षी ५.७२ दशलक्ष टन उत्पादन झाले होते. तर महाराष्ट्रात उत्पादन ३.१९ दशलक्ष टन होईल. गेल्या वर्षी महाराष्ट्रात सोयाबीन उत्पादन ३.९५ दशलक्ष टन झाले होते. यंदा त्यात घट होणार अाहे, असा अंदाज ‘सोपा’ने व्यक्त केला अाहे.

सोयाबीन पीकक्षेत्र (लाख हेक्टरमध्ये)
२०१७-१८    १०५.९२
२०१६-१७    ११४.७९
उत्पादन अंदाज (दशलक्ष टनांमध्ये)
२०१७-१८     ९.१५
२०१६-१७    ११.४९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT