cotton
cotton 
अ‍ॅग्रो

राज्यात कापूस खरेदी २५ पासून

विनोद इंगोले

नागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन महासंघाची कापूस खरेदी होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. शासनाने त्या संदर्भात कापूस पणन महासंघाला तोंडी आदेश दिले असून पणन महासंघानेदेखील खरेदी संदर्भाने तयारी केली आहे.

राज्यात कापूस खरेदीबाबत यावर्षी अनिश्‍चितता निर्माण झाली होती. पणन महासंघाने गेल्यावर्षी नाफेडकरिता कापूस खरेदी केला होता. यावर्षी सी.सी.आय. करिता पणन महासंघाची खरेदी होणार आहे. त्यानुसार पणन महासंघाने आपली तयारी पूर्ण केली. दरम्यान, यावर्षी कापूस खरेदीसाठीदेखील ऑनलाइन नोंदणी शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. त्यामुळे पणन महासंघाकडे किती कापूस येईल, याबाबत अनिश्‍चितता आहे.

दरम्यान कापूस पणन महासंघाने 25 ऑक्‍टोबरपासून खरेदी सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. प्रधान सचिव त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आदेश दिले. त्यानुसार पणन महासंघाने आपली तयारी पूर्ण केली आहे. कापूस खरेदीच्या मुद्यावर सोमवारी (ता.16) मंत्रालयात तर मंगळवारी (ता.17) पणन महासंघाच्या संचालकांची बैठक होणार होती. या दोन्ही बैठका काही कारणांमुळे रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगीतले.

पहिल्या टप्प्यात 60 केंद्र
पणन महासंघाकडून राज्यात 25 ऑक्‍टोंबरपासून खरेदी सुरू केली जाणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 60 केंद्र प्रस्तावीत करण्यात आली आहे. पणन महासंघ स्वतंत्ररीत्या ही खरेदी करेल. सीसीआयची खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्‍यता असून त्यांची 70 ते 75 केंद्र राहणार आहेत. नजीकच्या काळात झालेल्या पावसामुळे कापूस भिजला परिणामी सीसीआयने खरेदी उशिरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT