Grapes-Management 
अ‍ॅग्रो

पावसाळी वातावरणात द्राक्षबागेचे व्यवस्थापन

डॉ. आर. जी. सोमकुंवर

गेल्या आठवड्यात द्राक्षबागेत सर्वत्र पाऊस सुरू आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत या वेळी तापमानात घट आली असून, सध्याचे तापमान ३०-३२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. सापेक्ष आर्द्रतासुद्धा ८०-९० टक्के किंवा काही ठिकाणी १०० टक्क्यांपर्यंत वाढलेली दिसते. या वेळी जमिनीत मातीच्या कणामध्ये पूर्णपणे पाणी जमा झालेले दिसेल. सध्याच्या वातावरणाचे काही ठिकाणी चांगले, तर काही ठिकाणी विपरीत परिणाम दिसून येतील. विपरीत परिणामांमुळे बागेत उत्पादन खर्च वाढू शकतो. या वातावरणात बागेतील व्यवस्थापन कसे करावे, या विषयी माहिती घेऊ. 

जुनी बाग -
जुन्या बागेमध्ये सद्यस्थितीत वातावरणाचे विपरीत परिणाम होताना दिसून येतील. बागेत वाढलेली आर्द्रता आणि कमी तापमान यामुळे जिबरेलीन्सचे प्रमाण वाढते. यामुळे वेलीचा शेंडा जास्त जोमात वाढताना दिसेल. शेंडा वाढ झाली म्हणजे काडीच्या पेऱ्यातील अंतरसुद्धा वाढेल. फुटींचा पेरा वाढला म्हणजे घडनिर्मिती कमी झाली, अशी परिस्थिती या वेळी नसेल. मात्र, शेंडा वाढ जास्त जोमात होत असल्यास काडीची परिपक्वता लांबणीवर पडेल. काही बागेत नुकतीच तळात दुधाळ झालेली काडी तशीच राहील. याकरिता बागेत शेंडा वाढ थांबवणे गरजेचे असेल. बागेतील शेडा वाढ नियंत्रणात ठेवण्याकरिता खालील उपाययोजना महत्त्वाच्या असतील.

शेंडा पिचिंग करणे - नवीन फुटीच्या शेंड्याकडे फक्त टिकली मारावी. यामुळे लवकर फूट निघणार नाही. काडी परिपक्व होण्यास मदत होईल.

    बागेत पालाशची (०ः०ः५०) ४ ते ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. जमिनीतूनसुद्धा पालाशची गरजेप्रमाणे उपलब्धता करावी.
    बोर्डो मिश्रणाची ०.५ ते ०.७५ टक्के प्रमाणे फवारणी करावी. 

रोगांचे व्यवस्थापन -
अ) काही परिस्थितीत बागेत डाऊनी मिल्ड्यू किंवा अँन्थ्रॅक्नोजचा प्रादुर्भाव झालेला दिसून येईल. बागेत सतत झालेल्या पावसामुळे नवीन कोवळ्या फुटींची वाढ होत आहे. अशा फुटींवर तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येतील. जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या परिस्थितीत काडीवरसुद्धा असेच ठिपके दिसतील. त्याकरिता खालील व्यवस्थापन उपयोगी ठरेल. 

    बागेतील नवीन व कोवळ्या फुटी त्वरीत काढाव्यात. या फुटींची गरज नाही. तशाच वाढल्यास काडीची परिपक्वता लांबणीवर जाईल, त्याचसोबत रोगाचे जिवाणू काडीमध्ये प्रवेश करतील. पुढील हंगामात घडावर लवकर प्रादुर्भाव होऊ शकतो.

    शिफारशीनुसारच कॉपरयुक्त बुरशीनाशकांची किंवा बोर्डोची फवारणी करून घ्यावी.

ब) कॅनोपीची गर्दी असलेल्या बागेत नक्कीच डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव दिसून येईल. या पावसाळी वातावरणामुळे काडीवर बगलफुटी जास्त प्रमाणात निघतात. त्यांची गर्दी होऊन कॅनॉपीत डाऊनी मिल्ड्यूच्या प्रादुर्भावास आवश्‍यक ते सूक्ष्म वातावरण तयार होते. तेव्हा खालील उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. 

    काडीवर निघालेल्या बगलफुटी त्वरीत काढून टाकाव्यात. यामुळे कॅनॉपीमध्ये हवा खेळती राहील. डाऊनी वाढीसाठी आवश्‍यक ते सूक्ष्म वातावरण तयार होणार नाही.

    काडीच्या तळातील २-३ पाने काढून घ्यावीत. यामुळे कॅनॉपीच्या शेवटच्या टोकापर्यंत फवारणी करणे सोपे होईल.

    कॅनॉपी किती जुनी आहे याचा विचार करून बोर्डो मिश्रणाची ०.५ ते ०.७५ टक्क्यापर्यंत फवारणी करावी.

क) जैविक नियंत्रण -
बागेतील सध्याचे वातावरण जैविक नियंत्रणाकरिता पोषक आहे. या वेळी बागेत आर्द्रता जास्त वाढल्यामुळे जैविक नियंत्रणातील ट्रायकोडर्मा, सुडोमोनस बॅसीलस इत्यादी जिवाणूंची संख्या वाढणे सोपे होईल. द्राक्षबागेत रोगनियंत्रणाकरिता जिवाणूंची संख्या किती आहे म्हणजेच उपलब्ध पॅकेटमध्ये काउंट किती आहे हे जास्त महत्त्वाचे असते. परंतु सध्या परिस्थिती चांगली असल्यामुळे ८-१० दिवसांत एक या प्रमाणे जैविक घटकांची फवारणी करता येईल. तसेच जमिनीतून ठिबकद्वारे देणे सुरू करावे. त्याचे पुढील काळात रोग नियंत्रणासाठी चांगले परिणाम मिळतील. 
- ०२०-२६९५६०६० (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT