राजकुमार राव याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. 'शादी मे जरुर आना' या चित्रपटानंतर त्याला एक वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर त्याने अनेक सुपरहीट चित्रपटात काम केलं. स्त्री आणि श्रीकांत सारख्या चित्रपटात त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली. दरम्यान राजकुमार रावने नुकतीच आयएएनएसला मुलाखती दिली. यावेळी त्याने अनेक गोष्टींवर भाष्य केलय.