
Mumbai Monorail Shutdown: मुंबईतील मोनोरेलच्या सेवेला सध्या बिघाडाचे ग्रहण लागले आहे. मोनोरेलच्या गाडय़ा जुन्या झाल्या आहेत. त्यात वारंवार बिघाड होत आहे. दरम्यान आज सकाळी मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. लोअर परेल जवळ मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मोनो स्थानकेही पूर्णपणे बंद करण्यात आली. तसेच घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाला. याचा परिणाम म्हणून घाटकोपर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची एकच गर्दी झाली.