cotton
cotton 
अ‍ॅग्रो

राज्यात दोन लाख क्‍विंटल कापूस खरेदी

प्रतिनिधी

अमरावती  - खासगी बाजारात कापसाला कमी दर मिळत असल्याने शेतकरी सीसीआय तसेच कापूस पणन महासंघाकडे कापूस विक्री करीत आहेत. त्यामुळे खरेदी सुरु होऊन अवघा आठवडाभराचा कालावधी लोटला असतानाच ‘पणन’ व ‘सीसीआय’च्या माध्यमातून तब्बल २ लाख क्‍विंटल कापसाची खरेदी झाली आहे. यापुढील काळात या दोन्ही यंत्रणांकडेच मोठ्या प्रमाणावर कापसाची विक्री करण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहिल असे संकेत आहेत.

जागतिकस्तरावर कापसाच्या सरकी दरात घसरण झाली आहे. त्याचा परिणाम देशाअंतर्गत कापसाच्या व्यवहारावरदेखील दिसून येत आहे. गेल्या वर्षी सरकीला ३५०० रुपये क्‍विंटल दर होता. या वर्षी सरकीचे दर २२०० रुपये क्‍विंटलपर्यंत खाली आले आहेत. रुई आणि सरकीच्या दरावर कापसाचे दर ठरतात. परिणामी, सरकी दरातील घसरणीचा परिणाम कापसाच्या दरावर झाला आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापसाला मागणी नसल्यचे सांगत व्यापारी कापसाला ५१०० रुपयांचा दर देत आहे. ओलावा अधिक असला तरी जिनिंग व्यवसायावर परिणाम होईल त्यामुळे नाइलाजाने इतका दर द्यावा लागत असल्याचे देखील व्यापारी सांगतात. व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळत असल्याने सीसीआय तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाला कापूस देण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. सीसीआयचा एजंट म्हणून पणन महासंघाने २७ नोव्हेंबरपासून कापूस खरेदीस सुरुवात केली. आजपर्यंत सुमारे २२ केंद्रे राज्यात सुरू झाली असून केंद्रांची संख्या ५० पर्यंत नेण्याचे प्रस्तावित आहे. 

दरम्यान, केंद्रे सुरू होऊन केवळ आठवडाभराचा कालावधी झाला असतानाच पणन महासंघाकडील कापूस खरेदी ५० हजार क्‍विंटलवर पोचली आहे. सीसीआयने १ लाख ६० हजार क्‍विंटल कापसाची खरेदी केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

पणन महासंघाने पहिल्या टप्प्यात २२ कापूस खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. केंद्रांची संख्या मागणीनुसार ५० पर्यंत नेण्याचे प्रस्तावित आहे. ८ ते १२ टक्‍के ओलावा असलेला कापूसच येथे खरेदी केला जातो.
- अनंतराव देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT