तात्यासाहेब कोरेनगर - वारणा सहकारी दूध संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त डॉ. विनय कोरे यांनी मार्गदर्शन केले.
तात्यासाहेब कोरेनगर - वारणा सहकारी दूध संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त डॉ. विनय कोरे यांनी मार्गदर्शन केले. 
अ‍ॅग्रो

‘वारणा’ दुबई, कराचीत दहा लाख लिटर दूध पाठविणार -डॉ. विनय कोरे

सकाळवृत्तसेवा

वारणानगर, जि. कोल्हापूर - वारणा दूध संघाच्या सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त दूध उत्पादक सभासदांचा सध्याचा पाच हजारांचा शेअर्स संघाच्या नफ्यातून १० हजारांचा, संस्था सभासदांचा १० हजारांचा शेअर्स संघाच्या वतीने ५० हजार रुपयांचा करणार आहे. वारणा दूध संघाकडे दूधपुरवठा करणाऱ्या १ लाख १० हजार दूध उत्पादकांचा दोन लाखांचा विमा संघामार्फत उतरविण्यात येईल. वारणा परिसरात जातिवंत जनावरांचे केंद्र उभारण्यात येईल. दुबई, कराचीत टेट्रापॅकमधून १० लाख लिटर्स दूध पाठविणार असल्याची घोषणा वारणा समूहाचे नेते, संघाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी केली.

तात्यासाहेब कोरेनगर येथील वारणा सहकारी दूध संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित वार्षिक सभेत अध्यस्थानावरून डॉ. कोरे बोलत होते. डॉ. कोरे म्हणाले, की सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांनी स्थापन केलेल्या संघाची सुवर्णमहोत्सवी वर्षात ७८३ कोटींची उलाढाल, ८३ कोटींचा नफा, दूध संकलनामध्ये १६ कोटी ४२ लाख लिटरची वाढ ही ५० वर्षांतील सर्वाधिक वाढ आहे. दूध उत्पादकांच्या जनावरांवर संघाचे डॉक्‍टर्स ‘स्पेशल व्हिजेट‘च्या माध्यमातून थेट गोठ्यात उपचार करतात. याची नोंद नेदरलॅंडमधील प्रतिनिधींनी घेतली. ‘ई-नाफ’च्या माध्यमातून प्रत्येक जनावरांची एकत्रित माहिती मिळणार असल्याने सर्वच दूध उत्पादकांनी बॅंकेत खाती सुरू करून संस्थामार्फत संघाकडे माहिती द्यावी. संघाने गाईच्या ३.५ फॅट ८.५ एसएनएफला २५ रुपये प्रतिलिटर दर दिला असून, यामध्ये ८.४ एस.एन.एफ. झाल्यास वारणा फक्त ३० पैसे कमी करतो, तर अन्य संघ १ रुपये ५० पैसे कमी करतात. आदिवासी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी १ लाख ५५ हजार लिटर, तर भारतीय सैन्य दलाला ४४ लाख लिटर दूध टेट्रापॅकच्या माध्यमातून पाठविले जाणार आहे. दही, फ्रेश पनीर, ताकसह सर्वच पदार्थांना मागणी असून, आता पनीरही शहरातील मॉलमध्ये उपलब्ध करून देणार आहे.  या वेळी डॉ. कोरे यांच्या हस्ते वारणा बासुंदीचा प्रारंभ झाला. अरुण कुंभार व जगन्नाथ लोहा यांनी सहकार गीत सादर केले. उपाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब गुळवणी यांनी श्रद्धांजली वाहिली. कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी स्वागत करून संघाच्या कामकाजाचा आढावा घेतला. सचिव के. एम. वाले यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. विषयपत्रिकेवरील सर्वच सर्व विषय मंजूर करण्यात आले. बॅंक ऑफ इंडिया बॅंकेचे विभागीय अधिकारी नितीन देशपांडे, अमृतनगर शाखा प्रबंधक विमलकुमार, लेखापरीक्षक रणजीत शिंदे, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, संघाचे उपाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब गुळवणी, कार्यकारी संचालक मोहन येडूरकर आदी या वेळी उपस्थित होते. शीतल बसरे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक एच. आर. जाधव यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT