Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

Actress Sobita shares her thoughts on love and relationship : अभिनेत्री शोबिता भूपालाने प्रेमाविषयीचे तिचे विचार व्यक्त केल्यावर ती नागा चैतन्यला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय.
Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

Sobita Dhulipala : अभिनेत्री समांथा प्रभूचा एक्स नवरा आणि अभिनेता नागा चैतन्य सध्या अभिनेत्री शोबिता धुलीपालाला डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही काळापासून रंगल्या आहेत. मध्यंतरी शोबिता आणि नागा चैतन्यने एका सफारीचे फोटो सोशल मीडियावर एकाच वेळी शेअर केल्यावर ते एकत्रच फिरायला गेले असल्याची बातमी सगळीकडे पसरली होती. पण अजूनपर्यंत या दोघांनीही या गोष्टीवर भाष्य केलं नाहीये. त्यातच अभिनेत्री शोबिता भूपालाने एका मुलाखतीत प्रेमाविषयी केलेल्या वक्तव्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

शोबिताने नुकतीच जीक्यू इंडियाला मुलाखत दिली. यावेळी तिने ती कायमच प्रेमात असते असं म्हंटलं. तिचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

काय म्हणाली शोबिता?

शोबिताला मुलाखतीमध्ये प्रेमाविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली,"मी प्रेमात असते. प्रेम ही व्यक्त करण्याची शक्ती आहे. ही एकच गोष्ट आहे जी गरजही आहे आणि जे मिळणं खूप मोठी गोष्ट आहे."

त्यानंतर शोबिताला रिलेशनशिपविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ती म्हणाली," माझ्याकडे बघून कुणालाही मी खूप खंबीर, स्वतंत्र आणि भावनाशून्य आहे आणि मी ज्या प्रकारचं आजवर काम केलंय त्यावरून अनेकांना हे खरं वाटतं. पण खरंतर मी पूर्ण विरुद्ध आहे. मी एक दुःखी आत्मा आहे. मला फार कमी गोष्टींमध्ये आंनद मिळतो. माझ्या गरजा फार कमी आहे. मला वाटतं समर्पण ही फार शुद्ध भावना आहे. मी याचा अनुभव घेतलाय का? मला नाही वाटत कि माझ्यातील अहंकार पूर्ण गेलाय कि मी ती भावना समजू शकेन. जर मी तसं करू शकले तर त्यासारखं सुंदर काही नाही."

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?
Made In Heaven 2 Controversy : 'एवढं वाटतं तर मग तुम्ही....!' मेड इन हेवनच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप

तिचं हे वक्तव्य चर्चेत असून ती खरंच नागा चैतन्यला डेट करतेय कि नाही हे मात्र अजून तिने उघड केलं नाहीये. तिच्या रिलेशनशिप स्टेटसविषयी जाणून घेण्यास तिचे चाहते उत्सुक आहेत.

नुकतंच हिंदुस्थान टाईम्सला शोबिताच्या जवळच्या व्यक्तीने मुलाखत दिली आणि नागा चैतन्य-शोबिता डेट करत असल्याचं कबूल केलं. ते त्यांचं रिलेशनशिप एन्जॉय करत असून त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडतो. पण त्यांना त्यांचं रिलेशनशिप खाजगी आणि लोकांच्या नजरेपासून दूर ठेवायचंय असं सूत्रांनी सांगितलं.

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?
Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com