871 posts sanctioned while 701 posts are vacant at shrigonda water resources department
871 posts sanctioned while 701 posts are vacant at shrigonda water resources department  871 posts sanctioned while 701 posts are vacant at shrigonda water resources department
अहमदनगर

श्रीगोंद्यातील जलसंपदाच्या रिक्त जागा भरणार कधी?

संजय आ. काटे

श्रीगोंदे (जि. अमदनगर) : तालुक्यातील सधनतेला कारण ठरलेल्या कुकडी विभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासूनची रिक्त संख्या डोकेदुखी ठरत आहे. कार्यालयात अनेक वर्षांपासून खुर्च्या व टेबल कर्मचारी नसल्याचे धूळ खात पडले असतानाच, आवर्तन काळात पाणी शेतकऱ्यांना मिळते की नाही, यासोबतच किती कर्मचारी व अधिकारी फिल्डवर असतात, याचे संशोधन होत नाही. जलसंपदामंत्री जयंत पाटील यात लक्ष घालणार आहेत की नाही आणि नेते त्यांना वास्तव का पटवून देत नाहीत, हा कळीचा मुद्दा आहे.


श्रीगोंद्यातील सरकारी कार्यालयांत कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी रोजच्या झाल्या आहेत. तलाठ्यांपासून तर पाटकऱ्यांपर्यंत कोणीही जागेवर सापडत नसल्याने लोकांची कामे रखडल्याचे चित्र गेल्या काही वर्षांत सातत्याने दिसते आहे. त्याचे खरे कारण, सरकारी कर्मचारी पगारापुरतेही काम करीत नाहीत असे मुळीच नसून, महत्त्वाच्या कार्यालयांत कर्मचाऱ्यांसह अनेक अधिकाऱ्यांची पदे रिक्तच असल्याने सावळा गोंधळ सुरू आहे.


श्रीगोंदे शहरात असलेल्या जलसंपदा विभागाच्या कुकडी विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या कोळवडी, घोड प्रकल्प, मढेवडगाव, श्रीगोंदे, सीना, खैरी, नगर लघुपाटबंधारे, करमाळा कालवा यांवरील उपअभियंत्यांच्या जागा रिक्त आहेत. तीन उपअभियंते नाहीत, २९ सहायक अभियंते नाहीत, दप्तर कारकुनांच्या ७२ रिक्त जागा आहेत. ११३ मोजणीदार नाहीत, कालवा निरीक्षकांच्या २३० जागा रिक्त आहेत. कालवा चौकीदार ७९ ठिकाणी नाहीत. हा विभागच राम भरोसे असून, घोड प्रकल्पात तर कोणीच राहिले नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

कुठे व कशा आहेत रिक्त जागा?

कुकडी विभाग क्रमांक दोन ः मंजूर पदे- ३६, रिक्त पदे- १७
सीना प्रकल्प, मिरजगाव ः मंजूर पदे १२३, रिक्त पदे- १०८
घोड प्रकल्प, मढेवडगाव व शिरूर ः मंजूर पदे २४६, रिक्त पदे- २०१
कुकडी पाटबंधारे उपविभाग, श्रीगोंदे ः मंजूर पदे- १६७, रिक्त पदे- १३२
कुकडी उपविभाग, करमाळा ः मंजूर पदे -१०१, रिक्त पदे- ९६
कुकडी उपविभाग, राशीन ः मंजूर पदे- १८, रिक्त पदे १३
लघुपाटबंधारे उपविभाग, नगर ः मंजूर पदे-७९, रिक्त पदे ५०
लघुपाटबंधारे उपविभाग, जामखेड ः मंजूर पदे- १०१, रिक्त पदे ८४
कुकडी विभागीय कार्यालयाअंतर्गत एकूण मंजूर पदे- ८७१, रिक्त पदे ७०१



आकृतिबंधाप्रमाणे अधिकारी व कर्मचारी हवे आहेत. प्रकल्पात केवळ पंचवीस टक्के कर्मचारी असल्याने, आवर्तन काळात नियोजनात अडचण येते. याबाबत वरिष्ठांना अहवाल मागेच कळविला आहे.
- स्वप्नील काळे, कार्यकारी अभियंता, श्रीगोंदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT