RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

Faf du Plessis Wicket: चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस धावबाद झाला. पण त्याची विकेट वादाच्या भोवऱ्यात अडकली.
Faf du Plessis Wicket
Faf du Plessis WicketSakal

Faf du Plessis Run Out: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत (IPL) 68 वा सामना शनिवारी (18 मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना होत आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होत असलेला हा सामना प्लेऑफमध्ये जागा मिळवण्याच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बेंगळुरू संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. बेंगळुरूकडून विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस सलामीला फलंदाजीला उतरले. या दोघांनी शानदार सुरुवात केली. पण विराटचे अर्धशतक थोडक्यात हुकले. तो 47 धावांवर 10 व्या षटकात बाद झाला.

तो बाद झाल्यानंतर फाफ डू प्लेसिसने जबाबदारी घेत शानदार खेळ केला आणि अर्धशतकही झळकावलं. मात्र डू प्लेसिस 13 व्या षटकात दुर्दैवीरित्या धावबाद झाला.

Faf du Plessis Wicket
IPL 2024: विराटचे दोन खणखणीत षटकार अन् धोनीचा देशपांडेला 'तो' इशारा, RCB vs CSK सामन्यातील Video व्हायरल

13 व्या षटकात शेवटच्या चेंडूवर रजत पाटिदारने सरळ शॉट खेळला. त्यावेळी फाफ डू प्लेसिस धाव घेण्यासाठी पुढे येत होता. याचवेळी गोलंदाजी करणाऱ्या मिचेल सँटेनरने चेंडू आडवण्याचा प्रयत्न केलेला असताना चेंडूला त्याचा स्पर्श झाला आणि चेंडू स्टंपला धडकला. त्यामुळे मैदानावरील पंचांनी थर्ड अंपायरची मदत घेतली.

त्यावेळी डू प्लेसिसची बॅट क्रिजमध्ये पोहचली आहे का यासाठी आणि नंतर त्याची बॅट जमीनीवर आहे की हवेत हे तपासण्यासाठी मायकल गॉफ यांनी अनेक अँगल्स पाहिले. त्यानंतर त्यांनी डू प्लेसिसची बॅट चेंडू स्टंपला लागला तेव्हा अगदी थोड्या अंतराने हवेत असल्याचा निर्णय दिला.

त्यांनी सँटेनरचा चेंडूला स्पर्श झाला आहे की नाही, हे देखील तपासले. अल्ट्रा एजमध्ये त्याचा चेंडूला स्पर्श झाल्याचे स्पष्ट दिसले. त्यामुळे अखेर डू प्लेसिसला धावबाद देण्यात आले. पण थर्ड अंपायरच्या या निर्णयावर डू प्लेसिस, पाटिदार आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघातील सदस्य अत्यंत निराश दिसले. डू प्लेसिस या निर्णयावर काहीसा चिडलेलाही दिसला.

Faf du Plessis Wicket
SRH vs PBKS : हैदराबादचा विजय अन् राजस्थानचं वाढणार टेन्शन; पंजाब खेळणार नव्या कर्णधारच्या नेतृत्वात

दरम्यान, त्यामुळे आता तो बाद होता की नाही, यावर सोशल मीडियावर चर्चेला तोंड फुटले आहे. काही युजर्सने थर्ड अंपायरच्या निर्णय योग्य असल्याचे म्हटले, तर काहींनी तो बाद नसल्याचे म्हटले. दरम्यान, डू प्लेसिसने शानदार खेळी केली. त्याने 39 चेंडूत 54 धावा केल्या. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले.

दरम्यान, हा सामना चेन्नई आणि बेंगळुरू यांचा अखेरचा साखळी सामना आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल झाला आहे. चेन्नईने मोईन अलीच्या जागेवर मिचेल सँटेनरला संधी दिली आहे, तर बेंगळुरूने विल जॅक्सच्या जागेवर ग्लेन मॅक्सवेलला खेळवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com