Minister Shankarrao Gadakh.jpg
Minister Shankarrao Gadakh.jpg 
अहमदनगर

होम क्वारंटाइननंतर मंत्री गडाखांची पुन्हा कोरोनाविरूद्ध लढाई... 

सुनील गर्जे

नेवासे (नगर) : तेरा दिवसांच्या होम क्वारंटाइन नंतर राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी पुन्हा जनतेत जाऊन कामाचा तसेच  कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठीच्या नियोजन बैठकांचा धडाका लावला आहे. त्यांच्या पहिल्या आमदारकीच्या काळातील विकासकामांसह जलसंधारणाच्या कामांमुळे त्यांची जिल्ह्यात आजही कामदार आमदार...पाणीदार...आमदार..! ही प्रतिमा कायम आहे. हीच प्रतिमा ते मंत्रीपदाच्या मिळालेल्या संधीतून राज्यातील जनसामान्यांत करतील यात शंका नाही.

मंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नी पंचायत समितीच्या माजी सभापती, महिला बचतगट चळवळीच्या नेत्या सुनीता गडाख यांना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर मंत्री गडाख हे स्वतःहून (ता.१७) जुलै रोजी होम कवारंटाईन झाले. त्यांनीही स्वतःचा स्वॅब तपासणीसाठी दिला होता. मात्र, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. 

मंत्री गडाख यांचा होम कवारंटाइनचा तेरा दिवसांचा कालावधी (ता.२९) जुलै रोजी संपल्यावर त्यांनी ते पालकमंत्री असलेल्या उस्मानाबाद येथे शुक्रवार (ता. ३१) जुलै रोजी कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसह सर्व अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेऊन जनहिताच्या कामांचे धडाधड निर्णय घेऊन ते मार्गी लावण्यासाठी आदेश दिले. उस्मानाबाद येथील दौरा होताच त्यांनी थेट मुंबईत कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थिती लावली.

दरम्यान ते दररोज कामानिमित्त येणाऱ्या नेवासे तालुक्यासह नगर जिल्हा व राज्यातील विविध भागातून येणाऱ्या शेकडो कार्येकर्ते, नागरिकांच्या सामाजिक अंतर पाळून संपर्कात असतात. दरम्यान ते होम क्वारंटाइन काळातही नागरिकांसह  कार्येकर्ते, अधिकारी यांच्या संपर्कात होते. ते दररोज नेवासे तालुक्यासह नगर व उस्मानाबाद जिल्ह्याचा कोरोना आढावा घेत. नेवासे तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना बाधित रुग्णसंख्या लक्षात घेता मंत्री गडाख यांनी मंगळवार (ता. ४) रोजी नेवासे फाटा येथील कोविड केअर सेंटरला (विलगिकरण कक्ष) भेट देऊन रुग्णांना व विलगिकरण कक्षात असलेल्या नागरिकांशी संवाद त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.

दरम्यान त्यांनी याच ठिकाणी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार रुपेश सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी, गटविकास अधिकारी शेखर शेलार, मुख्याधिकारी समीर शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ.रविंद्र कानडे, सार्वजनिक बांधकामचे मच्छिंद्र बनसोडे, कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीत नेवासे तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संदर्भात व कोरोनाच्या बाबत अंमलबजावणी व उपाययोजना करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला.

यावेळी मंत्री गडाख म्हणाले, "नेवासे तालुक्यात आठ दिवसांपासून ३०-४० गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. नेवासे शहर, सोनई व सलबतपूर येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहे. कोविड सेंटरमध्ये जे बाधित रुग्ण आहे. त्यांना सामाजिक अंतर राखत आज भेटलो त्यांच्याशी चर्चा करून मानसिकता भक्कम करण्याच्या दृष्टीने हितगूज केले. कोरोना बाबत कोणीही घाबरून जाऊ नका, धाडसाने पुढे जावे लागणार आहे.

आज कोविड सेंटर मध्ये ७९ जणांची तब्येत व्यवस्थित आहे. पुढील दुष्टीने ५०० ते ६०० बेडची व्यवस्था झाली असून शनिशिंगणापूर व वडाळा हॉस्पिटलमध्ये १०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. शिंगणापूर येथे सर्व सुविधा असल्याने व नगर इस्पितळात भरलेले असल्याने शासन व शिंगणापूर यांच्या वतीने उपचार करणार आहे.

यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी यांनी तालुक्यातील कोरोनाच्या सद्य स्थितीबाबत माहिती दिली. तसेच प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन व तहसिलदार रुपेश सुराणा यांनी ठोस उपाययोजना करण्याच्या दुष्टीने सूचना केल्या. बैठकीस उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, सतीश पिंपळे, ऍड. काकासाहेब गायके, ऍड. कारभारी वाखुरे, राजेंद्र उंदरे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख  म्हणाले, जनतेने कोरोनाला घाबरून न जाता शासन नियमांचे पालन करून कोरोना विरोधात लढा देण्यासाठी सज्ज व्हा. कोविड बाबत कोणीही राजकारण न करता सर्वांनी एकत्रित येऊन कोरोनाच्या विरोधात लढा द्यायचा आहे.


संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT