crime
crime  Sakal
अहमदनगर

Ahmednagar : पारनेर तालुक्यात गुन्हेगारी वाढली

सकाळ वृत्तसेवा

पारनेर : तालुक्यात नुकताच झालेला गोळीबार, तसेच चोऱ्या, दुचाकीचोरी व मुलींना फूस लावून पळविण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही, अशी चर्चा सुरू आहे.सध्या तालुक्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. नुकताच मांडओहोळ परिसरात तीन परप्रांतीय मजुरांनी दिवसाढवळ्या ठेकेदारावर गोळीबार केला होता.

त्यात तो ठेकेदार गंभीर जखमी झाला. याच आठवड्यात पारनेर शहरातील मध्यवस्तीत असलेल्या जीएस महानगर बँकेतील एका ग्राहकाने कर्ज भरून सोडविलेले साडेपाच तोळे सोने चोरीस गेले. अशाप्रकारे तालुक्यात अनेक गुन्हे घडत आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या चोऱ्या, अवैध व्यवसाय, तसेच अल्पवयीन मुली पळवणे, त्याचबरोबर दुचाकीच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. तालुक्यात सध्या गुन्हेगारांनी तोंड वर काढले असून पोलिसांचा धाक राहिला नाही, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.

तालुक्यातील चोऱ्यांची संख्या वाढली आहे. चोऱ्या, भांडणे मारामाऱ्या त्याचबरोबर दुचाकी चोऱ्या ही बाब तर नित्याचीच झाली आहे. सुपे येथे औद्योगिक वसाहत असल्याने देशातील अनेक राज्यांतून विविध कंपन्या, तसेच बांधकाम व्यवसाय, हॉटेल यांसाठी अनेक कामगार येथे येतात. हे कामगार सुपे येथे खोल्या भाड्याने घेऊन राहतात. घरमालक हे ते फक्त जास्त भाडे देणाऱ्याला खोल्या भाड्याने देतात. मात्र, तो कामगार कुठून आला आहे, कोठे काम करतो, याचा विचार न करता फक्त जास्तीत जास्त भाडे कसे मिळेल याचा विचार करतात. त्यामुळे हे कामगार नेमके कोण आहेत, कोणत्या राज्यातील आहेत, याविषयाची कोणतीही माहिती घरमालक, ग्रामपंचायत किंवा पोलिसांना नसते.

आदेश कागदावरच

जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र पाटील यांनी मध्यंतरी आदेश काढून औद्योगिक वसाहत असलेल्या व इतरही ठिकाणी भाडेकरू म्हणून राहणाऱ्या कामगारांची नोंद घेण्याचे आदेश काढले आहेत. अशा प्रकारची नोंद जिल्ह्यात कोठेही घेतली गेली नाही. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक यांचा आदेश फक्त कागदावरच राहिला आहे.

आम्ही घरमालक, लॉजधारक, तसेच कारखानदारांना आपल्याकडील कामगारांची नोंद, तसेच आधार कार्ड झेरॉक्स जमा करण्याचे आदेशच देत आहोत. लवकरच कामगार, तसेच बाहेरून आलेल्यांची नोंद करणार आहोत.

- नितीनकुमार गोकावे, पोलिस निरीक्षक, सुपे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT