arrested
arrested esakal
अहमदनगर

Crime News : चारचाकी वाहन चोरणारी टोळी अटकेत; दोन पिक-अप, एक दुचाकी जप्त

सकाळ वृत्तसेवा

पारनेर : एका ठिकाणी चोरलेली चारचाकी, दुचाकी वाहने दुसऱ्या ठिकाणी नेऊन विकणारी टोळी सुपे पोलिसांनी पकडली आहे. त्यांच्याकडून दोन पिक-अप आणि एक दुचाकी जप्त केली आहे.

एका तालुक्यात वाहने चोरायची आणि दुसऱ्या तालुक्यात नेऊन विकण्याचा धंदा ही टोळी करायची. सुपे पोलिस रात्रीची गस्त घालत असताना ही टोळी त्यांच्या हाती लागली. इरफान हारून खान (वय २५), मुश्पिक निजाम सय्यद (वय २७), मुस्ताफ सय्यद (वय १९, रा. सर्व देवळाली प्रवरा, ता. राहुरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (Latest Marathi News)

तीन मे रोजी पोलिस सुपे गावात रात्रगस्त घालत असताना त्यांना एका दुचाकीवर तिघेजण संशयितरीत्या फिरताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी पळ काढला होता. पोलिसांनी पाठलाग करून यातील इरफान खान यास ताब्यात घेतले. (Breaking Marathi News)

त्याच्याकडे चौकशी केली असता, ते सुपे येथे पिक-अप वाहन चोरण्यासाठी आले असल्याचे त्याने सांगितले. पळून गेलेल्या दोन्ही संशयितांची माहिती घेऊन पोलिसांनी राहुरी येथे पथक पाठवून त्यांनाही जेरबंद केले. त्यांच्याकडून एक पिक-अप वाहन (अंदाजे किंमत १० लाख) व एक दुचाकी जप्त करण्यात आली. ही वाहने गंगापूर पोलिस ठाणे हद्दीतून चोरल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच एक पिक-अप श्रीरामपूर येथील संदीप जगन साठे यास विकल्याचे तपासात निष्पन्न झाले. मात्र साठे याचा तपास केला असता तो फरार झाला आहे. या टोळीकडून आणखी वाहनचोरी घड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुढील तपास सुपे पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

Fadnavis Interview : ''मी यू टर्न घेतोय, पण शिवसैनिकांना काहीतरी सांगावं लागेल'', शाहांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Jennifer Lopez & Ben Affleck : अवघ्या दोन वर्षात जेनिफर-बेन घेणार घटस्फोट ? मीडिया रिपोर्ट्सने उडवली खळबळ

Aditya Thackeray: लोकसभेनंतर शरद पवार भाजपसोबत जातील का? विश्वासार्हतेबद्दल आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT