माझी वसुंधरा
माझी वसुंधरा  sakal
अहमदनगर

अहमदनगर ; ‘वसुंधरा’मध्ये मनपा अव्वल

सकाळ ऑनलाईन टीम

अहमदनगर: महापालिकेने ‘माझी वसुंधरा अभियान- २’मध्ये अमृत गटात राज्यात अव्वल क्रमांक मिळविला आहे. या कामगिरीबद्दल महापौर, उपमहापौर, तसेच अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक पर्यावरणदिनी (ता. ५) गौरव करण्यात येणार आहे.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ‘माझी वसुंधरा अभियान २’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भूमी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित ही स्पर्धा होती. त्यात अमृत गटात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अमृत शहरांमध्ये अहमदनगर महापालिका अव्वल ठरली आहे. महापालिकेने पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी ऊर्जा बचत करणारे पथदिवे, सौर ऊर्जा प्रकल्प, वृक्षगणना, पुरातन प्राचीन वृक्षांचे जतन, वॉटर हार्वेस्टिंग, पाणी लेखापरीक्षण, ऊर्जा लेखापरीक्षण, उद्याननिर्मिती, जलसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण, भिंतींचे रंगकाम व सुशोभीकरण, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे, चार्जिंगची व्यवस्था करणे अशा योजनांवर प्रभावीपणे काम केले.

या सर्व कामांची पाहणी निरीक्षण समितीने केली. वर्षभर सातत्याने हा उपक्रम राबविण्‍यात आल्यामुळेच महापालिकेला हे यश मिळाले आहे. खासदार डॉ. सुजय विखे, आमदार संग्राम जगताप यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात आले. महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, घनकचरा विभागाचे प्रमुख किशोर देशमुख, परीक्षित बिडकर, उद्यान विभागप्रमुख शशिकांत नजान यांचा पर्यावरणदिनी गौरव होईल.

महापालिका क्षेत्रात पर्यावरण रक्षणाचे चांगले काम होत आहे. स्वच्छ व सुंदर नगरसाठी सर्वच पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम केले. नगरकरांनी त्याला साथ दिली. त्यामुळेच हा गौरव झाला.

- रोहिणी शेंडगे, महापौर

वसुंधरा अभियानांतर्गत वेगवेगळ्या योजनांवर काम करण्यात आले. महापालिकेच्या सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले. नागरिकांनीदेखील प्रत्येक उपक्रमात सहभागी होत महापालिकेला सहकार्य केले. त्यामुळेच चांगली कामगिरी करता आली. महापालिकेचे हे काम पुढेही असेच सुरू राहील.

महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात येत आहेत. त्याचबरोबर शहर स्वच्छ व सुंदर कसे होईल, यावरही काम सुरू आहे. वसुंधरा अभियानांतर्गत शहरात मोठे काम उभे राहिले.

- गणेश भोसले, उपमहापौर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: नाशिकात ५ तर दिंडोरीत ६ उमेदवारी अर्ज बाद

SCROLL FOR NEXT