Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबातील सदस्या सोबत माझे कौटुंबिक नाते तयार झाले आहे. सामान्य माणूस मला विसरू शकत नाही, हीच माझी कमाई आहे.
omprakash raje nimbalkar over lok sabha election people vote development work
omprakash raje nimbalkar over lok sabha election people vote development workSakal

- अविनाश काळे

उमरगा :  वाढती महागाईने त्रस्त झालेली जनता, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे खोटे आश्वासन यामुळे लोकांमध्ये प्रचंड नकारात्मक भूमिका आहेत आणि एकाच कुटुंबातील घराणेशाही या बाबी माझ्या विजयासाठी पुरक ठरणाऱ्या असुन मतदारांच्या प्रचंड सहानभुतीमुळे त्यात आणखी भर पडेल ;

तरीही मतदारांनी जागरूकतेने मशाल चिन्हासमोरील बटण दाबुन विजयी करण्याचे आवाहन उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा निवडणुकीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी केले. दरम्यान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा दोन वेळा पराभव केला असुन आता त्याच कुटुंबात पराभवाची हॅट्रिक होईल असे सांगुन ओमराजेंनी हि निवडणूक जनतेनेच हाती घेतल्याचा दावा केला.

निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी (ता. तीन) कसगी, बलसुर व तुरोरी येथे आयोजीत सभेत खासदार निंबाळकर बोलत होते. या वेळी बाबा पाटील, अश्लेष मोरे, अँड. शितल चव्हाण, अँड. सुभाष बसवराज वरनाळे, विकास हराळकर, संजय चालुक्य, रज्जाक अत्तार, संजय पवार, बाबुराव शहापुरे, विजय वाघमारे, सुधाकर पाटील, विलास व्हटकर, अजिंक्य (बापू) पाटील आदींची उपस्थिती होती.

खासदार ओमराजे पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील विकासासाठी मी केव्हांही तयार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबातील सदस्या सोबत माझे कौटुंबिक नाते तयार झाले आहे. सामान्य माणूस मला विसरू शकत नाही, हीच माझी कमाई आहे. 

सर्व जातीधर्मातील लोकांचे प्रश्न, विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी माझा लढा कायम राहिल.  "मशाली" ला मतदान करुन विकासाचा प्रकाश निर्माण करण्याची संधी देण्याचे आवाहन निंबाळकर यांनी या वेळी केले. दरम्यान ओमराजेंनी

वकिल, व्यापारी व डॉक्टर्स मंडळीशी साधला संवाद साधून मतदान करण्याचे आवाहन केले. या वेळी अँड. शितल चव्हाण यांचे भाषण झाले, ते म्हणाले की, देशातील महागाईमुळे आणि भारतीय संविधान बदलण्याच्या षडयंत्रामुळे मोदी विरोधी लाट आहे. जागरूक मतदाराने सध्याच्या स्थितीचे अवलोकन करुन महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजेंना विजयी करावे. असे आवादन केले. माजी नगराध्यक्ष अत्तार, सुधाकर पाटील यांची यावेळी भाषणे झाली.

वकिल, व्यापारी व डॉक्टर्स मंडळीशी साधला संवाद खासदार निंबाळकर यांनी शुक्रवारी उमरगा न्यायालयात वकिल मंडळींशी संवाद साधला. व्यापारी व डॉक्टर्स मंडळीशी  संवाद साधून, त्यांच्या संबंधित प्रश्नाची सोडवणूक करण्याची हमी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com